जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेच्या निवडणूकीत काँग्रेसचा एकहाती विजय

 तिवसा जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेच्या निवडणूकीत काँग्रेसचा एकहाती विजय

आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच सहकारातही पुन्हा एकदा वर्चस्व. 

तिवसा जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेच्या निवडणूकीत काँग्रेसचा एकहाती विजय
Congress-wins-Tiosa-Ginning-Pressing-Co-operative-Society-elections

तिवसा: तिवसा तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या तिवसा जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेचे निकाल काल 29 ऑक्टोबर रोजी जाहिर झाले. त्यामध्ये 15 पैकी 15 जागावर काँग्रेसच्या शेतकरी पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने या संस्थेवर काँग्रेसचीच एकहाती सत्ता असल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले. विजयी उमेदवारांचा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. 

तिवसा जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेच्या 17 पैकी 2 जागेवर बिनविरोध निवडणूक झाली. तर उर्वरीत 15 जागांवर काँग्रेसच्या शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्ता हस्तगत केली.

यामध्ये मुकुंद आमले, सुभाष खारकर, सुदाम गंधे, जयकृष्ण दिवे, पंकज देशमुख, विवेक देशमुख, तुळशीराम भोयर, प्रविण लसनापूरे, साहेबराव लसनापूरे, डॉ. रघुनाथ वाडेकर, डॉ. विरेश साबळे तर राखीव मतदारसंघातून सौ. रेणूका देशमुख, कु. तेजस्वीनी वानखडे  ह्या विजयी झाल्या.

15 पैकी 15 जागांवर दणदणीत विजय संपादन करणाऱ्या काँग्रेसच्या शेतकरी पॅनलच्या विजयी उमेदवारांचा काल 29 ऑक्टोबर रोजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच तिवसा जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. आणि सहकारी संस्था सक्षम झाल्या तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांच भल होईल. यासाठी सर्व मतभेद बाजूला सारुन सर्वांनी एकत्रितपणे ही संस्था आर्थिक व इतर दृष्टीने कशी सक्षम होईल यासाठी प्रयत्न करावेत, असा मनोदय आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी बोलतांना दिला. यावेळी नगरसेवक वैभव वानखडे, किशोर दिवे, सरपंच सुरज धुमणखेडे, प्रद्युम्न पाटील, शुभम धस्कट, अक्षय पवार, आशिष बायस्कर, सुदर्शन चरपे आदी उपस्थित होते. 


सहकार क्षेत्रात आमदार यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व

अमरावती कृषि उत्पन्न बाजार समिती व तिवसा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात नेत्रदिपक विजय संपादन करीत एकहाती सत्ता काँग्रेसने कायम राखली. त्यामुळे आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांचे सहकार क्षेत्रातही सक्षम नेतृत्व अधोरेखित झालं होतं. त्यानंतर आता परत काल 29 ऑक्टोबर रोजी जाहिर झालेल्या तिवसा जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेच्या निवडणूकीत त्यांच्या नेतृत्वात शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व जागावर विजय संपादन करुन इथे एकहाती सत्ता हस्तगत केली. त्यामुळे परत एकदा तिवसा मतदारसंघातील सहकार क्षेत्रावर आमदार ॲड. यशोमती ठाकूरांचा दबदबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Previous Post Next Post