आकांक्षा ठाकूर यांच्या पुढाकाराने त्यांची सुद्धा दिवाळी गोड झाली…
तिवसा : दिवाळीचा सण आला। सर्वांणीच पाहिजे केला। परि पाहावा कोण राहिला। भुकेला घरी॥ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेतील या ओविंना कृतीची जोड देत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या कन्या आकांक्षा ठाकूर यांनी आज 11 नोव्हेंबर रोजी तिवसा शहरात पंचवटी चौकात कपडा बँक या सामाजिक उपक्रमाअंतर्गत गरजू कुटुंबांना कपडे वाटप व फराळ वाटप करुन एक हात मदतीचा दिला.
आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या कन्या आकांक्षा ठाकूर यांनी गेल्या 8 वर्षापासून तिवसा विधानसभा मतदारसंघात कपडा बँक हा सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरु ठेवला आहे. या माध्यमातून समाजातील गरजू कुटुंबांना दरवर्षी दिवाळीच्या मंगल पर्वावर कपडे वाटप करण्यासोबतच त्यांची दिवाळी सुद्धा गोड व्हावी यादृष्टीने फराळाचे वाटप करण्यात येते. यावर्षी तिवसा शहरातील असंख्य गरजू कुटुंबांना आमदार यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तिवसा नगरपंचायतचे अध्यक्ष योगेश वानखडे, नगरसेवक वैभव वानखडे, नरेंद्र विघ्ने, पिंटू राऊत, गौरव चौधरी, नगरसेवक अमर वानखडे, किसनराव मुंदाने, तिवसा शहर काँग्रेसचे अध्यक्ष सेतु देशमुख, सुनिल बाखडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष धिरज ठाकरे, हरिदास भगत, दिवाकर भुरभुरे, सुनिल राऊत, सागर राऊत, तिवसा महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली काळे, अंकुश देशमुख, उमेश राऊत, आनंद शर्मा, गौरव देशमुख, वैभव काकडे, सचिन वानखडे, तुषार लेवटे, आकाश मकेश्वर, प्रणव गौरखेडे, आशिष खाकसे, अनिकेत प्रधान आदी उपस्थित होते.
त्यांची दिवाळी गोड झाली
दिवाळी हा सर्वात आनंदाचा उत्सव असतो. मात्र रस्त्याच्या कडेला पाल टाकून राहणाऱ्या निराधार कुटुंब मात्र यापासून वंचित असतात. त्यांची दिवाळी गोड व्हावी या सामाजिक दायित्वातून आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या कन्या आकांक्षा ठाकूर यांनी पुढाकार घेवून कपडा बँक व आमदार यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या माध्यमातून पारधी व भराडी समुदायाच्या बेड्यावर गरजू कुटुंबातील पुरुष, महिला व चिमुकल्यांना कपडे भेट देवून फराळाचे वाटप सुद्धा केले. दिवाळीच्या निमित्त त्यांना मिळालेल्या या मदतीच्या हातामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मात्र दिवाळी गोड झाल्याचे समाधान स्पष्टपणे जाणवत होते.