तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर मार्गदर्शन
धुळे : रिलायन्स फाउंडेशन धुळे आणि कृषी विज्ञान केंद्र धुळे यांचा संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन 30 जून रोजी रिलायन्स काऊंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाणे यांनी केले होते.
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणुन कृषी विज्ञान येथील डॉ प्रवीण चव्हाण यांनी सोयाबीन पिका व्यवस्थापन जसे कि पिकांवरील पाने पोखरणारी अळी, चक्रि भुंगा, खोड माशी, उट अळी याबात तसेच तण व्यवस्थापण याची महिती दिली. यावेळी जगदीश कानेपुरी यांनी बियाणे निवड, बिजप्रक्रीया सोयाबीन पिकांच्या जाती, खत व्यवस्थापन बद्दल माहिती दिली.