कपाशी पिकावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
धुळे : रिलायन्स फाउंडेशन धुळे यांच्या माध्यमातून जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी कपाशी पीक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन कार्यक्रम २९ जूनला घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स काऊंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाणे यांनी केले होते.
यावेळी प्रा. राजेंद्र जाने यांनी शेतकऱ्यांना कापुस पिक, बिज प्रक्रिया, कापुस पिकांतील विविध जाती, लागवडीचे अंतर, गुलाबी बोंडअळी नियंत्रण, खत व्यवस्थापण या विषयी मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.