अखेर #दुरोंतो_एक्सप्रेस ला बडनेरा येथे मिळाला स्टॉप.
खा. डॉ. अनिल बोंडे यांनी मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रावसाहेब दानवे यांचे आभार
अखेर #दुरोंतो_एक्सप्रेस ला बडनेरा येथे मिळाला स्टॉप. खा. डॉ. अनिल बोंडे यांनी मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रावसाहेब दानवे यांचे आभार. #अमरावतीकरांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे की नागपूर – मुंबई – नागपूर ही दुरोंतो एक्सप्रेस ही डोळ्यासमोरून जात होती पण बडनेराला स्टॉप न्हवता. डॉ. अनिल बोंडे हे खासदार झाले आणि त्यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे अमरावती – पुणे गाडी व बडनेरा येथे दुरोंतो एक्सप्रेस ला थांबा मिळवा यासाठी गळ घातली होती. त्यापैकी दुरोंतो एक्सप्रेसचा स्टॉप हा बडनेराला मिळाला आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवाश्याना अंबा एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस व सोबतच सुपरफास्ट दुरोंतो एक्सप्रेस चा लाभ मिळणार आहेत. ही प्रवाश्याकरिता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी व रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मानले.
पहा सविस्तर आपल्या कृषीप्रधान टीव्हीवर