शेतकऱ्यांना धान कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

व्हाट्स अँप ग्रुप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना धान कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

भंडारा जिल्हया मध्ये मोठ्या प्रमाणात धान लागवड केली जाते. सध्या धान पीक काढणीचा शेवटचा टप्पा बाकी आहे तरी धान पिकावर अनेक कीडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मनात धान पीक कीड व रोग व्यवस्थापन बद्दल अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा यांच्या मार्फत तंत्रज्ञांनावर आधारित “व्हाट्स अँप ग्रुप चॅट” या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिनांक 17/10/2021 रोजी धान पीक कीड व रोग व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशन चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री. धम्मदीप गोंडाने व कार्यक्रम सहाय्यक श्री. अमित मेश्राम यांनी केले होते. 

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक. राजेंद्र जाणे (कृषि तज्ञ) यांनी भंडारा येथील शेतकऱ्यांना धान पिकावर येणाऱ्या विविध कीड जसे तुडतुडा , खोडकिडा , गादमाशी तसेच करपा , या विवध रोगबद्दल व त्यावरील उपाय योजना बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल. 

भंडारा जिल्ह्यातील विविध गावातून अनेक शेतकऱ्यांनी ग्रुप मध्ये प्रश्न विचारून त्यांच्या शंकाचे निराकरण केले.
Previous Post Next Post