झेंडे जीर्णोद्धार पथयात्रा सोहळा आयोजन
अमरावती: अवधूत संप्रदायामध्ये दोन उंच सागाची झेंडे असून संप्रदायाचे ते निशाण आहे, त्या झेंड्यांना कोणी सगून तर कोणी निर्गुण, माय ब्रम्ह,
देवभक्त आदी नावांनी संबोधतात.
झेंडे जीर्ण झाल्यानंतर बदलण्याची म्हणजेच जीर्णोद्धाराची प्रथा आहे त्याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील जळगाव बेलोरा येथील श्री संत बहिणाबाई संस्थान येथील झेंडे जिर्णोद्धार सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील राहू येथुन जळगाव पर्यंत ०२ ऑक्टोबर ते ०५ ऑक्टोबर पर्यंत झेंडे जीर्णोद्धार पथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच अवधूत देवस्थान तळेगांव श्या पंत येथील सुद्धा झेंडे याच पथ यात्रेत आणण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
झेंडा सागचा होय | साग नोहे देव भगवान होय || (अ. भ.)
सर्व जीवांचा मालिक असा तो एक धनी भगवंत जगाच्या कल्याणा करिता सगुण आणि निर्गुण रूपाने अवतरीत होऊन खेळ करत आपला वारसा सांभाळतात अवधूत संप्रदायाचे हे दोनच केवळ निर्माते समर्थ कृष्णाजी महाराज सगुणाचा तर समर्थ हेंगडुजी महाराज निर्गुनाचा वारसा सांभाळण्याचे पाईकत्व निर्गुण निराकाराणे बहाल केले आहे. त्यामुळे अवधूत संप्रदायात दोन झेंडेना फार महत्व आहे