जळगांव बेलोरा येथे कोरोना रुग्ण आले आटोक्यात
आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने रुग्ण वाढीला लागला ब्रेक
घरोघरी जाऊन तपासणी करताांना आरोग्य पथक
आर्वी : तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या जळगांव बेलोरा या गावी मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला होता, त्यात गावातील काही रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी सुद्धा पडले; आणि गावात भयंकर भीतीचे वातावरण पसरले परंतु जळगांव येथील आरोग्य विभागाच्या चमूने अविरत प्रयन्त करत गावातील पोजिटिव्ह रुग्णांना तातडीने उपचार व नियमित पणे घरी भेटी देऊन पाहणी करून त्यांना नियमितपणे मार्गदर्शन केले आणि गावातील 64 कोरोना रुग्णापैकी सद्यसस्थित फक्त 2 रुग्ण वगळता सर्वच निगेटिव्ह येऊन बरे झाले.
जळगाव मध्ये मार्च ते 15 एप्रील पर्यत एकुण 64 रुग्ण व कोपरा गावामध्ये 15 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असता बहूसंख्य रुग्ण हे गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते तर काही घरातील संपूर्ण कुटूंबच कोरोणा बाधित झाले होते, अशा परिस्थितीत रुग्णांना प्रा.आ.केंद्र जळगाव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. कवरासे मॅडम यांचे मार्गदर्शनात जळगाव चे आरोग्य सेवक श्री शिंगणे व गावातील आशा स्वंयसेविका यांनी रुग्णांना नियमित गृहभेटी देऊन त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी व तापमान याची नोंद घेवून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत होते.
तसेच ग्रामपंचायत प्रशासनच्या सहकार्याने गावात सॅनिटाईजर फवारणी सुद्धा वेळोवेळी करण्यात आली, यामध्ये शिक्षकांचे सुद्धा सहकार्य लाभले, त्यामुळे कोरणा बाधित व्यक्तींनी कोरोणावर यशस्वीपणे मात केली. आज फक्त 2 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
योग्य काळजी व नियमितपणे प्रशासनाच्या नियमाचे पालन केले तर आपण नक्की कोरोनावर मात करू शकतो हे मात्र नक्की आहे