शासनाने लस उपलब्ध करुन दिल्यास लोकांना मोफत लसीकरण करण्यास तयार - डॅा.रीपल राणे
आज शासनाच्या वतीने कोरोना महामारी रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सरकारी रुग्णालया सोबत खाजगी हॉस्पिटल मधून राणे हॉस्पिटल ला सुध्दा लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. र्त्यादरम्यान राणे हॉस्पिटल मार्फत आतापर्यंत जवळपास २५०० लोकांना यशस्वी पणे लस देण्यात पण आली. मात्र सध्या संपुर्ण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असल्यामुळे प्रशासनाद्वारे खाजगी रुग्णालयांना लस उपलब्ध करण्यात आली नसून, ज्यांना खाजगी रुग्णालयात लस घ्यावयाची आहे त्यांची मोठी पंचाईत होत आहे. त्यामुळे राणे मल्टिस्पेशिलिटी हॅास्पीटल आर्वी चे संचालक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॅा. रीपल राणे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देउन सरकारी रुग्णालयाच्या धर्तीवर जर राणे हॉस्पिटल ला लस उपलब्ध करून दिली तर राणे हॉस्पिटल मार्फत सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्याची तयारी दर्शविली आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
आर्वी शहरात मध्यवर्ती ठिकाणी वसलेले राणे मल्टिस्पेशिलिटी हॅास्पीटल हे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे जनसामान्य लोकांना सेवा देणारे रुग्णालय असून लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा सोबतच सुसज्ज अशी जागा व अत्यावश्यक परिस्थिती हाताळण्याचे पूर्ण सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्याअनुषंगानेच खाजगी रुग्णालयाच्या लसीकरणाकरिता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जवळपास २५०० लोकांना सुसज्ज व चांगल्या पद्धतीने लस देण्यात आली. त्यात या लसीकरण कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः बाह्य रुग्ण विभाग आंतर रुग्ण विभाग व रोजच्या शस्त्रक्रिया सांभाळून सुद्धा डॅा.कालिंदी राणे व डॅा.रीपल राणे यांनी स्वतः लस टोचली व या लसीकरण मोहिमेचा नागरिकांना योग्य माहिती देऊन प्रचार सुद्धा केला. या अनुषंगाने आता वाढत्या लसीकरण कार्यक्रमात राणे मल्टिस्पेशिलिटी हॅास्पीटल आर्वी ला समाविष्ट करुन घेण्यात यावे. आपण लस उपलब्ध करुन द्यावी. जर आम्हाला शासन द्वारे मोफत लस उपलब्ध झाली तर आम्ही लोकांकडून कुठल्याही प्रकारची शुल्क न आकारता मोफत लस देउन शासनाच्या महत्वाकांक्षी अशा राष्ट्रीय लसीकरण मोहिमेमध्ये आमचा खारीचा वाटा नोंदवू इछितो अशा आशयाचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी वर्धा यांना डॅा. रीपल राणे यांनी दिले.
जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी. व यासंदर्भात जनजागृती होऊन लोकांनी लस घेण्याकरिता प्रवृत्त व्हावे या उदात्त हेतूने या मोहिमेमध्ये स्वतच्या रुग्णालयाला समाविष्ट करुन घेण्याची विनंती प्रत्यक्ष भेटून जिल्हाधिकारी वर्धा यांना केली अशी माहिती यावेळी राणे मल्टिस्पेशिलिटी हॅास्पीटल आर्वी चे संचालक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॅा. रीपल राणे यांनी दिली.