रिलायन्स फाऊंडेशनच्या पशुवैद्यकीय सुविधेमुळे झाली खर्चात बचत’
श्री अमोल वासुदेव गारघाटे, ग्राम वडगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
(मोबाइल नंबर ७४९९५३३६२०)
श्री. अमोल वासुदेव गारघाटे (२८) हे ग्राम वडगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील शेतकरी आहेत. त्यांचेकडे शेतीसोबतच एक गाय, चार म्हशी आणि आणि दोन बैल एवढे पशुधन आहे. या सर्व जनावरांना दोन ते तीन आठवड्यांपासून लंपी स्कीन हा त्वचेचा आजार झाला होता. यावेळी जनावरांना झालेला हा नवीनच आजार असल्यामुळे आणि लवकर बरा होत नसल्यामुळे अमोल घाबरला होता. जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी लसीकरण व इतर वैद्यकीय सेवा-सुविधा वडगाव या गावात उपलब्ध नव्हत्या. त्याच्या शेतीत सुरु असलेली डवरणीसारखी वेळेत करावयाची महत्त्वाची कामे रखडली होती. अशा विपरीत परिस्थितीत अमोल त्याच्या आजारी गुरांना पशु दवाखान्यात नेण्याचा विचार करीत होता. योगायोगाने, रिलायन्स फाऊंडेशन आणि पशुवैद्यकीय दवाखाना- श्रेणी-१, मांढेरी ता. वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने त्याच्या गावातच दिनांक ९ सप्टेंबर, २०२० रोजी सदर त्वचेच्या आजारासाठी मोफत पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अमोलने त्याच्या सर्व बाधित जनावरांना या पशु आरोग्य शिबिरात नेले. तिथे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे आणि पशुवैद्यकीय दवाखाना- श्रेणी-१, मांढेरी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. के. अघडते यांनी जनावरांनाची तपासणी केली व आजाराने पीडित जनावरांना गोळ्या आणि इंजेक्शन देवून विशेष आणि पूर्णतः मोफत उपचार केले. गुरांच्या गोठ्यात फवारणीसुद्धा केली. पुढील काही दिवस सर्व बाधित जनावरांना वेगवेगळे ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आणि बाहेरून काही औषधे खरेदी करण्यास सांगितले. या उपचारानंतर, त्याची सर्व बाधित जनावरे एका आठवड्यातच आजारातून बरी झालीत. त्यामुळे बैलांचा शेतीसाठी वेळेवर वापर करता आला व दुसऱ्या बैलांवर भाड्यासाठी होणारा खर्च वाचला. त्याला बाहेरील खाजगी उपचारासाठी लागू शकणारा रु. ३०००/- प्रती जनावर म्हणजे एकूण रु. १५,००० एवढा खर्च वाचला.
“रिलायन्स फाऊंडेशनने लंपी स्कीन या पशु आजारासाठी आयोजीत केलेल्या पशु शिबिरातून मिळालेल्या उपचारामुळे माझी सर्व बाधित जनावरे या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहेत. माझ्या जनावरांना झालेल्या या त्वचा आजारामुळे मी घाबरून गेलो होतो. मला बाहेरील खाजगी उपचारासाठी मला एकूण रु. १५,००० एवढा खर्च आला असता; तो वाचला.” - श्री अमोल वासुदेव गारघाटे, ग्राम वडगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर (मोबाइल नंबर ७४९९५३३६२०)