जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करून जमिनीची सुपीकता वाढवावी: डाॅ. एन.एस.वझिरे
05 डिसेंबर हा दिवस जागतिक पातळी वर जागतिक मृदा दिवस म्हणून संपन्न होत आहे, जशी मनुश्याला आरोग्य बिघडल्यानंतर औषधांची गरज असते, तशी जमिन सध्या मृत झाली आहे व तिला सुध्दा मातीचे परिक्षण करून / तपासणी करून योग्य खत व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे आपण पिक चांगले दिसावे/ हिरवे दिसावे याकरीता खतांचा खूप जास्त वापर करतो व यामुळेच आपली शेती मृत झाली आहे परंतु जमिनीमध्ये होणाऱ्या खताच्या अतिरीक्त वापरामुळे जैव विविधता लुप्त होत आहे, जमिनीतून फक्त उत्पादनच मिळत नाही तर ऊर्जा सुध्दा मिळते यांचे कारण म्हणजे जमिनीवरील मातीचा सूपीक थर होय. 05 डिसेंबरच्या निमित्याने सर्व जगात हा दिवस साजरा केला जात आहे. जमिन आरोग्य पत्रिकेनुसार जर खत व्यवसस्थापण करता आले तर जमिन सुपिक होईल व योग्य उत्पादन सुध्दा मिळेल असे प्रतिपादन मा. डाॅ. एन.एस.वझिरे, का.स. कृषी विज्ञान केंद्र,साकोली यांनी केले ते कृषी विज्ञान केंद्र, साकोली द्वारे ‘‘जागतीक मृदा दिना निमित्त’’ आयोजित शेतकरी मेळावा व जमिन आरोग्य पत्रिका वितरण समारंभ कार्यक्रमात बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र, भंडारा ;साकोली, रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा अंतर्गत सि.एम.आर.सी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘जागतिक मृदा दिन’’ निमित्त शेतकरी मेळावा, व जमिन आरोग्यपत्रिका वितरण कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर सभागृह, चांदोरी ता. भंडारा, जि. भंडारा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. पडोळे, पंचायत समिती सदस्य, डाॅ. एन.एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र,साकोली श्री. प्रमोद पी. पर्वते, शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, श्री. एस. एन. साबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, श्री. धम्मदीप गोंडाणे, जिल्हा व्यवस्थापक, रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा भंडारा, श्री. कपिल गायकवाड, संगणक, तंत्रज्ञ,सौ. रंजना खोब्रागडे व सौ. अरुणा बांते , महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा, श्री. शेंडे, कृषी मित्र, चांदोरी यांचेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. श्री. प्रमोद पी. पर्वते, शास्त्रज्ञ, कृषी विस्तार यांनी 05 डिसेंबर हा दिवस सन 2013 पासून साजरा करण्यात येत असून प्रत्येक वर्षी नविन घटकावर जास्त प्रकाष टाकला जातो, यावर्शी 2020 मातीची सजीवता जपण्यासाठी जैव विविधतेचे रक्षण करा हा मुख्य विशय आहे. कृषी विज्ञान केंद्र, साकोली कडील माती परिक्षण प्रयोग शाळेत माती नमुने तपासणी करून त्याची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना पोहचविण्यात येते. भंडारा जिल्हयातील सेंद्रीय कर्बे मध्यम असुन ते वाढविण्याकरीता सेंद्रीय किंवा हिरवळीचे खतांचा वापर करावा. कृषी विज्ञान केंद्र, साकोली कडे माती परिक्षणाकरीता दोन फिरत्या माती प्रयोगषाळा व एक स्थायी प्रयोगषाळा उपलब्ध असून भंडारा जिल्हयातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात माती परिक्षण करावे असे आवाहन केले. श्री. एस. एन. साबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व, माती नमुना घेण्याची पद्धत, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, जमीन आरोग्य पत्रिकेवर आधारीत खत व्यवस्थापन याविशयी संपूर्ण माहिती देउन शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात माती परिक्षण करावे असे आवाहन केले. मा. श्री.पडोळे, पंचायत समिती सदस्य, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना धान पिक घेतानी शात्रीय पद्धतीने शेती करून माती परीक्षण करूनच पिकांची लागवड करावी तसेच शेतीला जोडधंदाची जोड देउन आर्थिक नफा मिळवावा असे सांगितले तसेच त्यांच्या शेतातील प्रयोगांची माहिती देउन दुग्ध व्यवसायाची माहिती दिली सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्त जमिन आरोग्य पत्रीकाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री. प्रमोद पर्वते, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार यांनी केले तर आभार श्री. राहुल मेश्राम यांनी मानले.