महामानवाच्या ६४व्या महापरिनिर्वाणदिनी कोटी शतकोटी नमन

*।.महापरिनिर्वाण.।*

*वाचा फोडूनी मुक्यानां ,केले जीवाचे ते रान.|*
*६ डिसेंम्बर दिनी घडले, मुक्तीदात्याचे महापरिनिर्वाण.|*

*ठरला विद्यवत्तेचा महामेरू पाहिलं हे जगानं..*
*६ डिसेंबर दिनी घडले, युगंधराचे महापरिनिर्वाण.|*

*लढा तो न्याय, समतेचा उंचावली मान ही गर्वानं*
*६ डिसेंबर दिनी घडले विश्वरत्नाचे महापरिनिर्वाण.|*

*माय-बाप झालास अमुचा, पोटची लेकरं ती त्यागून..*
*६ डिसेंम्बर दिनी घडले बा-भीमाचे महापरिनिर्वाण.।|*

*नतमस्तक होती चैत्यभूमीस त्या डोळ्यातील अश्रूनं..*
*६ डिसेंम्बर दिनी घडले बोधिसत्वाचे महापरिनिर्वाण.||*

*ललकार ती नागपूराची देऊन धम्म बुद्धाचा दान...*
*६ डिसेंम्बर दिनी घडले मुकनायकाचे महापरिनिर्वाण..||*

*देहाने अंत जरी हा, असे जिवंत पेटत्या विचारानं*
*६ डिसेंम्बर दिनी घडले क्रांतिसूर्याचे महापरिनिर्वाण.|*

*शोषितांचा आवाज होऊन लिहलं भारताचं संविधान..*
*६ डिसेंम्बर दिनी घडले महामानवाचे महापरिनिर्वाण..|||*

*👏महामानवाच्या ६४व्या महापरिनिर्वाणदिनी कोटी शतकोटी नमन.... विनम्र अभिवादन💐👏*

शब्दांकन-अक्षय सं. सवाळे..,आर्वी जिल्हा वर्धा..||
मो.९५६१६३९८६२.||
Previous Post Next Post