रिलायन्स फाऊंडेशनच्या माहिती सेवांमुळे उत्पादन खर्चात झाली मोठी बचत

रिलायन्स फाऊंडेशनच्या माहिती सेवांमुळे उत्पादन खर्चात झाली मोठी बचत’

संजय महादेव काळे (43) हे ग्राम माथा, ता. कोरपणा, जिल्हा चंद्रपूर येथे राहतात. संपूर्ण उपजीविकेसाठी  शेतीवर अवलंबून असणारे संजय यांचेकडे ११ एकर शेती असून ते पारंपारिक पद्धतीने शेती करतात. सन २०२०-२१ मध्ये त्यांनी ४ एकरात सोयाबीन आणि  ७ एकरात कपाशी आणि तूर या पिकांची लागवड केली होती. वाढलेला उत्पादन खर्च आणि कमी उत्पादनाच्या समस्यांमुळे ते त्रस्त होते. याच वर्षी त्यांना रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवाद्वारा शेती तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यापर्यंत त्वरित आणि मोफत दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच फाऊंडेशनच्या डायल आउट फोन इन कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला तसेच व्हाट्स अप शेतकरी गटात नोंदणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेती करणे सुरु केले. खरीप २०२० मध्ये त्यांचे कपाशीवर पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव वाढला आणि मोठ्या प्रमाणात पातेगळ सुरु झाली होती. कपाशीला आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांची दुसरी मात्रा देखील त्यांना जाणून घ्यायची होती. यासाठी त्यांना रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवेच्या माध्यमातून  कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील मुख्य कृषि शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते यांच्याशी त्वरित जोडून देण्यात आले. डॉ. नागदेवते यांनी संजयला युरिया या रासायनिक खताची एकरी शिफारशीत मात्रा देण्याचा सल्ला दिला.  यापेक्षा अधिक खत दिल्यास रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अधिक वाढू शकतो असे त्यांनी सांगितले. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी फिप्रोनील ५% हे कीटकनाशक १० लिटर पाण्यात दीड ग्राम मिसळून फवारणी करण्यास सांगितले. तसेच पातेगळ थांबविण्यासाठी प्लानोफिक्स हे संजीवक १५ दिवसांच्या अंतराने दोनदा स्वतंत्र फवारण्याचे सुचविले. त्यांच्या  सल्ल्याचे तंतोतंत पालन करीत संजयने सर्व उपाययोजना केल्या. याचा त्याला खूप फायदाही झाला. खते, कीटकनाशके आणि संजीवके इत्यादींचा अनावश्यक आणि अति वापर केल्यामुळे यापूर्वी संजयचे नुकसान व्हायचे. परंतु यावर्षी या बाबींवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होऊन कपाशीची पातेगळ प्रभावीपणे थांबली; पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आणि कपाशीची उत्तम वाढ होऊन उत्पादनही वाढले. त्यामुळे त्याच्या खर्चात एकरी रु. ३,५०० ची बचत झाली आणि सात एकरात रु. २४,५०० चा फायदा झाला.

मी पारंपारिक पद्धतीने शेती करीत असल्यामुळे आधी माझा उत्पादन खर्च  खूप जास्त होता. रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवेमुळे मला थेट कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील मुख्य कृषि शास्त्रज्ञांसोबत त्वरित बोलता आले आणि वेळेत आणि खात्रीलायक सल्ला मिळाल्यामुळे उपाययोजना वेळेतच मिळाली. मला कपाशी पिकाबद्दल खूप चांगले मार्गदर्शन मिळाले व माझा सुमारे २५,००० रु खर्च वाचला.” - संजय महादेव काळे, ग्राम माथा (मो. क्र. ९९२३३०१४६९).
Previous Post Next Post