रिलायन्स फाऊंडेशनच्या पशुवैद्यकीय शिबिर व मार्गदर्शनामुळे दूध उत्पादन वाढले

रिलायन्स फाऊंडेशनने कोरोनाच्या काळात  पशुवैद्यकीय सुविधा पुरविल्यामुळे दुध उत्पादन वाढले
डिगांबर तिर्थानंद रुखमोडे (३५) हे ग्राम कटंगधरा, ता. साकोली, जिल्हा भंडारा येथील रहिवाशी आहेत. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून ते सन २०११  पासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून छोट्याश्या दुध व्यवसायाकरिता पशुपालन करतात. त्यांचेकडे एकूण तीन म्हशी असून त्यापैकी दोन म्हशी दुध देणाऱ्या आहेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने दुध उत्पादन करणे व त्यानुसार जनावरांची देखभाल करणे, अश्या बाबींविषयी माहिती देणारी यंत्रणा कटंगधरा या गावात नव्हती. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने पशुपालन करून ते दुध उत्पादन घ्यायचे. परंतु, जनावरे आजारी होणे आणि दुधाचे उत्पादन कमी येणे ह्या नेहमीच्याच समस्या डिगांबरसमोर होत्या. जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी लसीकरण, चारा आणि आहार व्यवस्थापन, दुधाचे शास्त्रशुद्ध आणि ज्यादा उत्पादन घेण्यासाठी व्यवस्थापन इत्यादी बाबींच्या शोधात तो होता. योगायोगाने, रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवाद्वारा त्याच्या गावातच दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी विनामूल्य पशुवैद्यकीय निदान शिबिर आयोजित केले होते. डिगांबरने  त्याच्या दोन्ही दुधाळ म्हशी तपासणीसाठी या शिबिरात नेल्या. पशु चिकित्सक डॉ. वाघाडे यांनी दोन्ही म्हशींची तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केले. त्यांनी या म्हशींचे दूध उत्पादन वाढविण्याबाबत, चारा आणि सकस आहाराबाबत मार्गदर्शन केले. बकऱ्यांना लस दिली आणि काही. म्हशींना लसीकरण करून दिले, दुध वाढीसाठी  पावडर व औषध दिले आणि जंतनाशक औषधीसुद्धा  दिली. डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचारानंतर आणि मार्गदर्शनानंतर त्याने चारा आणि पशु आहारामध्ये सुधारणा केल्या. म्हशींच्या आरोग्यात भरपूर  सुधारणा झाली आहे; आणि त्यामुळे ते म्हशींच्या आरोग्याविषयी चिंतामुक्त झाले आहेत. आधी दोन्ही म्हशींमिळून दर दिवशी  एकूण १२ लिटर दुध उत्पादन मिळत होते. त्यामध्ये एकूण चार लिटर वाढ होवून दररोज १६ लिटर दुध उत्पादन मिळत आहे. एवढेच नव्हे तर,   त्याचा या म्हशीच्या उपचारावर  एकूण अडीच ते  तीन  हजार रुपयांपर्यंतचा खर्च तसेच इतर त्रास वाचला. चारा आणि सकस खाद्यामध्ये दरमहा एकूण सुमारे रु. ४,००० ची बचत झाली आहे. दुध उत्पादनातून रु. ५०/- प्रती लिटर प्रमाणे दरमहा रु. ६००० ची मिळकत वाढली आहे.
“मी माझ्या जनावरांना उपचारासाठी बाहेर नेले असते, तर मला सुमारे रु. ३००० रुपये खर्च करावे लागले. दुध उत्पादन वाढीबाबत अगदी योग्य सल्ला मिळाला व त्यापासून महिन्याला रु. ६०००/- जास्त मिळत आहेत. सर्व उपचार अगदी योग्य वेळी, गावात येवून विनामूल्य मिळाल्याने मी आनंदी आहे. कोरोच्या भीतीयुक्त वातावरणात जनावरांना बाहेरगावी दवाखान्यात नेण्यासाठी होणारा त्रास, वाहतुकीचा खर्च, डॉक्टरांची फी इ. चा खर्च वाचला. या सुविधेबद्दल रिलायन्स फाऊंडेशनचा मी आभारी आहे.” - डिगांबर तिर्थानंद रुखमोडे, कटंगधरा
Previous Post Next Post