रिलायन्स फाऊंडेशनच्या पशुवैद्यकीय शिबीरामुळे वाचले पशुधनाचे प्राण’
श्री किरण संभाजी तुराणकर, ग्राम वडगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
(मोबाइल नंबर ९६०७४४०५१२)
श्री. किरण संभाजी तुराणकर (४५) हे ग्राम वडगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील रहिवाशी असून त्यांचेकडे शेतीसोबतच शेतीकामासाठी दोन बैल आहेत. याशिवाय त्यांचेकडे एक गाय आणि एक गोऱ्हा सुद्धा आहे. या सर्व जनावरांना एक महिन्यापासून लंपी स्कीन या त्वचेच्या आजाराची लागण झाली होती. जनावरांना झालेला हा नवीन आजार लवकर बरा होत नसल्यामुळे तो त्रासून गेला होता आणि सोबतच त्याच्या शेतीतील कामेसुद्धा रखडली होती. शेतातील रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याला बैल भाड्याने आणून ती पूर्ण करावी लागली. दरम्यान, रिलायन्स फाऊंडेशन आणि पशुवैद्यकीय दवाखाना- श्रेणी-१, मांढेरी ता. वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने त्याच्या गावातच दिनांक ९ सप्टेंबर, २०२० रोजी सदर त्वचेच्या आजारासाठी खास पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. किरणने त्याच्या सर्व बाधित जनावरांना या पशु आरोग्य शिबिरात नेले. तिथे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे आणि पशुवैद्यकीय दवाखाना- श्रेणी-१, मांढेरी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. के. अघडते यांनी जनावरांनाची तपासणी केली व आजाराने पीडित जनावरांवर विशेष आणि पूर्णतः मोफत उपचार केले. पुढील काही दिवस सर्व बाधित जनावरांना वेगवेगळे ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आणि बाहेरून काही औषधे खरेदी करण्यास सांगितले. या उपचारानंतर, किरणची सर्व बाधित जनावरे एका आठवड्यातच आजारातून बरी झालीत. त्यामुळे बैलांचा शेतीसाठी वापर करता आला व दुसऱ्या बैलांवर भाड्यासाठी होणारा खर्च वाचला. त्याला बाहेरील खाजगी उपचारासाठी लागू शकणारा रु. ३००० एवढा खर्च वाचला. त्याच्या तरुण गोऱ्ह्याला जास्त प्रमाणात रोगाची बाधा झाली होती; त्यामुळे गोऱ्हा दगावण्याची भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे त्याचे सुमारे १५००० रु. वाचले.
“माझ्या जनावरांना झालेल्या लंपी स्कीन या त्वचा आजारामुळे मी त्रासून गेलो होतो. रिलायन्स फाऊंडेशनने आयोजीत केलेल्या पशु शिबिरातून मिळालेल्या उपचारामुळे माझी सर्व बाधित जनावरे या आजारातून पूर्णपणे बरी झालीत. मला बाहेरील खाजगी उपचारासाठी रु. ३००० एवढा खर्च आला असता; तो वाचला. याव्यतिरिक्त माझ्या तरुण गोऱ्ह्याला जास्त प्रमाणात रोगाची बाधा झाल्यामुळे तो दगावण्याची भीती होती. त्यामुळे माझे सुमारे १५००० रु. वाचले.” - श्री किरण संभाजी तुराणकर ,ग्राम वडगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर (मोबाइल नंबर ९६०७४४०५१२)