बुलडाणा : मांडवा येथे रात्री सोयाबीन गंजी जळुन खाक

मांडवा येथे रात्री सोयाबीन गंजी जळुन खाक


मांडवा येथे रात्री सोयाबीन गंजी जळुन खाक

देवानंद सानप (प्रतिनिधी) : 

बुलडाणा : लोणार तालुक्यातील बिबी येथील शेतकरी रामकिशन मुंढे यांच्या मालकीची शेतजमीन गट नंबर 244 मध्ये मांडवा शिवारात असुन मुंढे यांनी दिनांक 16 शुक्रवारला शेतातील सोयाबीन सोंगुन जमा करुन शेतात गंजी (सुडी) लावली होती दिनांक 16 च्या मध्यरात्री सोयाबीन गंजी अचानक जळुन खाक झाल्याचे सकाळी समजले असता रामकिशन मुंढे यांनी बिबी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.  यामध्ये 27 किंटल सोयाबीन जळुन खाक झाले असून मुंढे यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

घटनेची माहिती मिळताच बिबी पोलीस स्टेशनचे जमादार पवार, पो काँ पंडीत नागरे सह महसूल च्या तलाठी बी एस पवार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल डी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस करीत आहेत

VIDEO NEWS : बुलडाणा : सोयाबीन गंजीला आग लागून संपूर्ण सोयाबीन खाक

Previous Post Next Post