रबी हंगामपूर्व शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन

 कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस साजरा

रबी हंगामपूर्व शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन



साकोली : कृषी विज्ञान केंद्र, साकोली, रिलायंस फाऊंडेषन माहिती सेवा भंडारा, कृषी विभाग भंडारा, उमेद भंडारा आणि माविम भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15.10.2020 रोजी यु-टयुब लाईव्ह फोनईन  मार्फत राष्ट्रीय महिला किसान दिवसानिमीत्त रबी हंगामपूर्व शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

    या कार्यक्रमाला मा. डाॅ. डि. एम. मानकर, संचालक विस्तार शिक्षण, डाॅ. पं.दे.कृ.वि., अकोला हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच डाॅ. अनिल कोल्हे, सहयोगी संषोधन संचालक, वि.कृ.सं.कें, सिंदेवाही, श्री. हिंदूराव चव्हान, जि.अ.कृ.अ., भंडारा, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर डाॅ. एन.एस.वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृ.वि.के, साकोली,  डाॅ. जि. आर. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृ.सं.कें, साकोली, श्री. धम्मादीप गोंडाने, आणि श्री. राहुल मेश्राम रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा भंडारा हे प्रमुख मार्गदर्षक म्हणून उपस्थित होते.

    

या कार्यक्रमा प्रसंगी डाॅ. डि. एम. मानकर, यांनी उपस्थितांना मार्गदर्षन करतांना सांगितले की, धान हे पूर्व विदर्भातील पारंपारीक पिक असून शेतकरी वर्शानूवर्शे या एकाच पिकाची लागवड करतात व अलिकडे उत्पादन खर्च वजा जाता धान या पिका पासून अधिक आर्थिक नफा मिळत नाही असे निदर्षनास आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ धानाचेच पिक न घेता इतरही पिकांकडे वळावे असे आवाहन केले. धान शेती बरोबरच पषुपालन व दुग्ध व्यवसाय, भाजीपाला पिके, फळपिके, रेशिम शेती, मधुमक्षिका पालन इत्यादी व्यवसाय करावेत व आपली आर्थिक उन्नती साधावी असे सांगितले. शेती व्यवसायात महिलांचा वाटा मोलाचा असून आपण सर्वांनी मिळून महिलांच्या सबलीकरणासाठी विषेश प्रयत्न करायला पाहिजे व त्यांना समाजात पुरूषाप्रमाणे समान स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.

    कार्यक्रमाचे प्रास्तावीक डाॅ. एन. एस. वझिरे, कार्यक्रम समन्वयक, कृ.वि.के, साकोली यांनी केले व त्यांनी उपस्थितांना कार्यक्रमाची रूपरेशा व महत्व समजावून सांगितले. याप्रसंगी त्यांनी धानावरील प्रमुख किडी व रोगांची ओळख व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्षन केले तसेच बीजप्रक्रीया व रबी हंगामातील प्रमुख पिकांचे नियोजन कशा प्रकारे करावे याविषयी मार्गदर्षन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र साकोली मार्फत पुढील पाच दिवसात हवामान कसे असेल याविशयी दामू प्रकल्पा अंतर्गत दर मंगळवार व शुक्रवार ला पिक निहाय कृशि सल्ला पत्रक व्हाॅट्सयॅप एम-किसान च्या मध्यमातून शेतकर्यांनपर्यंत पोहचविण्यात येतो असे सांगितले.

    डाॅ. अनिल कोल्हे, सहयोगी संषोधन संचालक, वि.कृ.सं.कें, सिंदेवाही यांनी भात शेती मध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष योगदान फार मोठे आहे त्यामुळे त्यांच्या एकंदरीत सबलीकरणाकरता आपना सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी धान पिकावरील तुडतुडा या किडीचे व्यवस्थापन कसे करावे याविशयी सखोल मार्गदर्षन केले.

श्री. हिंदूराव चव्हान, जि.अ.कृ.अ., भंडारा यांनी जिल्हयातील रबी पिकांचे नियोजन उत्तमरित्या करण्यात आले असून हरभरा व गहू या पिकांखालील क्षेत्र मागील वर्षीच्या तूलनेत वाढले आहे असे सांगितले. 

डाॅ. जि. आर. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार, कृ.सं.कें, साकोली यांनी धान पिकाच्या विविध वांनाविषयी माहिती दिली तसेच धान पिकावरील प्रमुख किडी आणि रोग यांच्या व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले. यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात झाला असल्यामुळे रबी हंगामामध्ये जमिनीमध्ये ओलावा फार काळ राहण्याची शक्यता असल्यामुळे रबी पिकांचे क्षेत्र वाढविण्यास वाव आहे असे सांगीतले. 

श्री. सुनिल साबळे, प्रयोगषाळा तंत्रज्ञ, यांनी मातीचा नमूना घेण्याची पद्धत व मृदा चाचणी चे महत्व विशद करतांना याविशयी सखोल मार्गदर्षन केले व जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मृदा चाचणी करावी असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निवारण तज्ञ मार्गदर्षकांकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. पी. पी. पर्वते, यांनी केले तर आभार श्री. धम्मादीप गोंडाने यांनी मानले.

Previous Post Next Post