राज्यातील मठ-मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात यावी : धर्मजागरण तर्फे तहसीलदारांना निवेदन

राज्यातील मठ-मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात यावी
विदर्भ प्रांत धर्मजागरण समन्वयच्या संस्कृती विभागातर्फे तहसीलदार यांना निवेदन

कारंजा (घा) :  कोविड-19 च्या प्रार्दुभावाला आळा बसावा म्हणून सात महिन्यांपासून राज्यातील मठ, मंदिरे, धार्मिक स्थळांवर लॉकडाऊन करण्यात आले. परंतु शासनाने मद्यालय, बसेस, बाजारपेठ, ग्रन्थथालयांना लॉकडाऊनमधून वगळले.मात्र, जनतेचे श्रद्धास्थान असलेले मंदिर, मठांवर अजुनही उघडण्यास बंदी आणली आहे. नवरात्रीच्या काळात भाविक भक्तांना देवी-देवतांच दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात येत आहे. भाविकांना त्यांच्या श्रद्धा जपता याव्या यासाठी शासनाने मंदिराचे द्वार उघडावे यासाठी विदर्भ प्रांत धर्मजागरण समन्वयच्या संस्कृती विभागातर्फे विविध धार्मिक स्थळे, संघटना, व संत - महंतांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार सचिन कुमावत कारंजा (घा)यांच्या मार्फत देण्यात आले.

या निवेदनात असे नमूद केले आहे की, कोविड-19 च्या महामारीमुळे आपण महाराष्ट्र राज्यात सर्वत्र उत्तम पद्धतीने व्यवहार बंदीची उपाययोजना आखली होती आणि त्याची अंमलबजावणी पण तितक्याच उत्तम पद्धतीने चोख बंदोबस्त करुन पाळण्यात आली होती. आता आपण हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत करीत आहात. आपण बहुतेक सर्व गर्दीच्या स्थळांवरची, प्रतिष्ठानांवरची बंदी उठविली व त्यांना पूर्ववत चालू करण्यास परवानगी दिली. परंतु सर्व समाजाचे श्रद्धास्थान असणारी मंदिरे, देवस्थानांवरील बंदी अद्याप उठविली नाहीत. इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे सर्रास सुरू असून त्यांना त्यांची श्रद्धा जपता यावी म्हणून प्रशासन त्यांच्या प्रार्थनास्थळांकडे दुर्लक्ष करीत आहे आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबाबाई अजुनही कुलूप बंद आहे. मंदिरे, देवस्थाने हे समाजाचे मनोबल वाढवणारी, मनाला शांती आणि समन्वय साधणरी, समाजाला संकटाशी लढण्याची प्रेरणा देणारी असतात त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपण विचार कराव व महाराष्ट्रात समस्त हिंदूंची मंदिरे, देवस्थाने यांच्यावरील बंदी उठवून ते परत पूर्ववत चालू करण्यात यावे.

ज्या प्रमाणे अन्य सर्व स्थळांवर, प्रतिष्ठानांवर शासन व्यवहार नियमावलीचे पालन करण्यासाठी कटिबद्ध केल्या जाते त्याचप्रमाणे या सर्व धार्मिक स्थळांवर सुद्धा शासन व्यवहार नियमावलीचे पालन बंधनकारक करण्यात यावे व हिंदू समाजाच्या भावनांचा मान ठेवून मंदिरे, देवस्थाने यावरील बंदी उठविण्यात यावी.

निवेदन देतेवेळी धर्मजागरण तालुका संयोजक प्रकाश पोळ,रामभाऊ प्रांजळे,बकुल जसानी,हेमंत मानंमोडे,राहुल पैठणे,स्पप्नील अग्रवाल, संजय अग्रवाल,जयंत टावरी, गोपाल पालीवाल,कैलास अग्रवाल, सनी जैस्वाल ,दीपक चांडक,पियुष मोठवानी,नितीन भुतडा, सागर दिवाने,अशोक पालीवाल,अनिल जैस्वाल,प्रेमराज डोंगरे,ब्रिजमोहन टावरी,ई. उपस्थित होते.
Previous Post Next Post