![]() |
ऍड दीपक मोटवानी |
शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास मोफत वकिली करणार ऍड दीपक मोटवानी
प्रतिनिधी : धिरज मानमोडे,
वर्धा : समाजाचे काही देणे लागते या भावनेतून आर्वी, जिल्हा वर्धा येथील तरुण आणि सुप्रसिद्द कायदेतज्ञ् ऍड दीपक मोटवानी यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्या वरील केसेस न्यायालयात मोफत लढविल्या जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच जिल्ह्यात शक्य तिथे कायदेशीर मदत सुद्धा करण्यात येईल असेही ऍड दीपक मोटवानी यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले ऍड दीपक मोटवानी
भारत हा कृषिप्रधान देश असून मी या देशात जन्माला आलो मी स्वत:ला भाग्यवान समजतो. भारतातील प्रत्येक शेतकरी कुटुंबातील कृतज्ञता व सेवेची संधी, म्हणून"शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांन विरुद्ध आंदोलनात सहभागी झाल्याने" जर फौजदारी केसेस दाखल झाल्या तर सर्व कामकाज मोफत करण्याचे योजिले आहे. आर्वी तालुक्यातील व परिसरातील बांधवांसाठी तसेच वर्धा जिल्हा न्यायालयात शक्य तिथे कायदेशीर मदत केली जाईल. आपल्या परिचयातील कोणावरही केसेस दाखल झाल्यास आम्हाला तात्काळ संपर्क करा. ऍड दीपक मोटवानी, आर्वी 9373043131
ऍड दीपक मोटवानी यांच्या या अभिनव उपक्रमाने त्यांच्यावर आर्वी शहारासह संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऍड दीपक मोटवानी, आर्वी 9373043131