छत्रपती राजे सेनेच्या युवती आघाडी नाशिक जिल्हाध्यक्षपदी आरती आहिरे यांची निवड
नाशिक : रणरागिणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, प्रणित छत्रपती राजे सेनेची स्थापना दि. ६ जून २०२० रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या पावन दिवशी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करुन नाशिक येथे करण्यात आली. फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. शरद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली सेनेची स्थापना करण्यात आली असुन सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. भुषण देवरे यांना देण्यात आली आहे.
सेनेचे प्रमुख उद्दिष्ट्यात सुशिक्षित बेरोजगारांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांअंतर्गत १ ते ५० लाखांपर्यंत सबसिडीयुक्त कर्ज मिळवुन देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आहे. ही योजना युवक युवतींसह महिला बचतगटांना देखील आहे.
ग्राहकांची होणारी फसवणुक थांबविण्यासाठी प्रतिसाद संस्थेअंर्तगत ग्राहक तक्रार निवारण कार्यालय चालविले जाते त्या कार्यालयाची मदत घेऊन सेना ग्राहकांची होणारी फसवणुकीविरोधात जनजागृती करत आहे. प्रतिसाद संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा क्रिडा पुरस्कार देखील मिळालेला आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. शरद बोडके हे आहे. आजवर सेनेच्या वतीने कोरोना रोगाच्या प्रादुर्भावात गरजुना किराणा वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक, पोलीस प्रशासनाला कोरोना रक्षणकिट वाटप, नागरिकांची कोरोना टेस्टींग व आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचा वाटप, जागतिक दिन, जयंती व पुण्यतिथी साजरा केल्या जात आहे.
आज अल्पावधीतच छत्रपती राजे सेना नाशिक शहर - जिल्हांसह बिड, नांदेड, परभणी, संभाजीनगर, जालना, लातुर, याचाच एकभाग म्हणुन आरती आहिरे युवती आघाडी जिल्हाध्यक्ष नाशिक पदावर सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शरद बोडके यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. भुषण देवरे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती केली गेली आहे.