सुधीर दिवे यांची भाजपाच्या प्रदेश चर्चा प्रतिनिधीपदी निवड


सुधीर दिवे यांची भाजपाच्या प्रदेश चर्चा प्रतिनिधीपदी निवड 


धिरज मानमोडे (प्रतिनिधी) : 

वर्धा : भारतीय जनता पार्टीची वर्धा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात एकसंध मोट बांधण्यात यशस्वी ठरलेले, कृषी क्षेत्रासोबत कायम जिव्हाळा असलेले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री सुधीर दिवे यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश चर्चा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. 

वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुधीर दिवे यांनी उपजिल्हाधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते तत्कालीन बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत काम सुरू केले होते. दरम्यान, महात्मा सहकारी कारखान्याची जबाबदारी त्यांना देण्यात आल्यानंतर दिवे यांचा ऊस उत्पादक शेतकर्‍यांसोबत थेट संपर्क आला. वर्धा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या मजबुतीकरणातही दिवे यांचा मोलाचा वाटा आहे. वर्धा लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे.

 [ads id="ads1"]

आर्वी विधानसभा मतदार संघात स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा शेतकरी, शेतमजुरांपर्यंत संपर्क होता. कारंजा तालुक्यातील धानोली येथे तयार केलेली गोशाळा, डेअरी, शेतीसंदर्भात असलेला अभ्यास, साखर कारखान्याचा प्रत्यक्ष असलेला अनुभव आणि ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य, नागपूर येथील पशु मत्स विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सदस्य आदी विविध भूमिका त्यांनी सांभाळल्या आहेत. हा सर्व अनुभव लक्षात घेऊन शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला राज्यात वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेणे सुरू केले आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवड केल्याने आपल्याला पुन्हा शेतकर्‍यांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. आपण आपल्या पदाला न्याय मिळवून देत शेतकर्‍यांचे प्रश्‍न तडीस लावण्यासाठी आपला यापूर्वीही प्रयत्न होता आणि पुढेही राहिल असे दिवे यांनी सांगितले.

Previous Post Next Post