खा संजय राऊतांच्या वक्तव्याचा भाजप तर्फे निषेध; कंपाउंडरचा केला सत्कार


मनोविकार  तज्ञांच्या कंपाउंडर चा भाजपने केला सत्कार

खा. संजय राऊत वर उपचार करण्याची डॉ. अनिल बोंडे यांनी कंपाउंडर ला केली विनंती


अमरावती : डॉक्टरांना काही समजत नाही, आजारी पडलो तरी मी कंपाऊंडर कडे उपचाराकरिता जातो असे म्हणणाऱ्या खा. संजय राउत यांचा तातडीने उपचार करण्याची कंपाऊंडरला माजी कृषीमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष यांनी विनंती केली आहे. व त्यांनी विख्यात मनोविकार कंपाऊंडरचा अनोच्छित सत्कार केला व त्यांना खा. संजय राऊतवर उपचार करण्याची विनंती सुद्धा केली.          

शिवसेनेचे खासदार व सामना चे संपादक संजय राउत एका वृत्तवाहनीच्या मुलाखतीमध्ये ठासून सांगतात, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ला काही समजत नाही उलट जागतिक आरोग्य संघटनेमुळे देशात कोरोना वाढला, डॉक्टरांना सुधा काही समजत नाही. कोविडच्या साठीमध्ये आपला जीव धोक्यात टाकून उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचा अपमान केला. 

[ads id="ads1"]

आजपर्यंत उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली व अनेक डॉक्टरांना त्यांचे प्राण सुद्धा गेले. अश्या डॉक्टरांविषयी सन्मानार्थ बोलणे सोडून डॉक्टरांना काही समजत नाही व मी नेहमी कंपाऊंडरकडून उपचार घेतो असे सांगून वारंवार डॉक्टरांचा अपमान केला म्हणून या वक्तवाचा निषेधार्थ आज अमारावती मध्ये माजी कृषीमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे व भाजपा अमरावती शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी  विख्यात मनोविकार कंपाऊंडरचा अनोच्छित सत्कार केला व त्यांना खा. संजय राऊतवर उपचार करण्याची विनंती सुद्धा केली. यावेळी डॉ. वसुधा बोंडे, भाजपा अमरावती शहर सरचिटणीस गजानन देशमुख, मंगेश कोंडे, महिला आघाडी अध्यक्ष लताताई देशमुख, कार्यालय मंत्री राजेश आखेगावकर, रविकिरण वाघमारे उपस्थित होते.

Previous Post Next Post