जागतिक दुग्ध दिन विशेष
डॉ जोगेकर यांचा शेतकऱ्यांन साठी विशेष लेख
आज जागतिक दुग्ध दिना निमित्त मी डॉ.मुकींदा जोगेकर,कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटने तर्फे समस्त गोपालकांना तसेच पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो.
अलीकडील लॉकडाऊनच्या काळात म.रा.राजपत्रित पशुवैद्यक संघटने तर्फे वेबिनारची शृंखला आयोजीत करण्यात आलेली आहे. पशुसंवर्धन विभागातील तज्ञ मंडळी कडून याचे अधून मधून पशुसंवर्धन विषयक अनेक विषयावर मार्गदर्शन होत राहते.या संधीचा लाभ सर्व पशुपालकांनी घ्यावा व आपला व्यवसाय वृद्धींगत करावा असे आव्हान मी यानिमित्ताने करू ईश्चितो.
सर्व पशुपालकांना आव्हान करण्यात येते की आपल्या जनावरांचे आरोग्य सुदृढ राखण्याच्या दृष्टीने मानसूनपूर्व लसीकरण करून घ्यावे तसेच दवाखान्यात उपलब्ध असणाऱ्या तोंडखुरी पायखुरी रोगाची लस आपल्या जनावरांना टोचून घ्यावी.जेणेकरून वर्षभर दुधाचे उत्पन्न आपल्या गायी-म्हशीं कडून घेणे शक्य होईल.त्याचप्रमाणे आपल्या कडील शेळ्या-मेंढ्यांना देखील दवाखाण्यातील उपलब्ध लसी टोचून घ्याव्यात.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज येत्या काही दिवसात पंचायत समिती तसेच विविध पशुवैद्यकिय दवाखान्यात उपलब्ध होणार आहे.तरी पशुपालक बंधू आणि भगिनींना विनंती करण्यात येते की त्यांनी याबाबत नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखाण्याशी संपर्क करून पशुसंवर्धन विषयक योजनांचा लाभ अवश्य घ्यावा.