मायबाप सरकार वीज बिल कसे भरावे?

मायबाप सरकार वीज बिल कसे भरावे?

मायबाप सरकार वीज बिल कसे भरावे?  

प्रतिनिधी गौरव सोमकुंवर :

कारंजा (घा.) :  लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब लोकांचे रोजगार बंद असल्यामुळे शासनाने लॉकडाऊन दरम्यान काळातील २०० युनिट पर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करावे असे मागणी सर्व स्तरातून जनतेने केली आहे. 

कोरोनाच्या  महासंकटामुळे आपत्ती काळात लॉकडाऊन दरम्यान अनेक गोरगरीब लोकांचा रोजगार हिरावला आहे, कामधंदे बंद आहे, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणारे अनेक कामगार, हमाल, ऑटोचालक ,टॅक्सी ड्रायव्हर,  रोज मजुरी करणारे कामगार, गवंडी कामगार, घरगुती कामगार, अनेक कारागीर, वेगवेगळ्या दुकानामध्ये काम करणारे कामगार, रेडी पटरी वाले छोटे व्यावसाइक ,अश्या अनेक छोट्या लोकांचे रोजगार बंद असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र  सरकारने संवेदशील  पणे सामान्य गोरगरीब जनतेचा विचार करून दिल्ली सरकारच्या धर्तीवर लॉ कडाऊन दरम्यानचे २०० युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करून संकट प्रंसंगी जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी  मा. तहसीलदार कारंजा घाडगे यांच्यामार्फत  महाराष्ट्र शासनाला व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कारंजा येथील जनतेने केलेली आहे.
Previous Post Next Post