रिलायन्स फाऊंडेशनच्या पशुधन शिबिरामुळे अनेक जनावरे झाली बरी

रिलायन्स फाऊंडेशनच्या पशुधन शिबिरामुळे अनेक जनावरे झाल बरी


रिलायन्स फाऊंडेशनच्या पशुधन शिबिरामुळे अनेक जनावरे झाली बरी 
पशुपालकांना मिळाला मोठा दिलासा

माझे नाव नंदकिशोर वामन वाकडे (४२), गाव धानोरा, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर . माझेकडे एक बैलजोडी, एक गाय- तिचे वासरु आणि एक बकरी आहे. नोव्हेंबर, 2019 मध्ये माझ्या बैलांच्या मानेची पोळ सुजली होती, पाठीच्या बरगड्या उघड्या पडल्या होत्या. गाईच्या शरीरावरही लहान गाठी आल्या होत्या व ती दूधही देत नव्हती. त्यामुळे तिचे वासरुही कुपोषणामुळे अशक्त झाले होते. बकरीलाही तिच्या ओठ आणि नाकपुड्याभोवती गाठी येवून जखमा झाल्या होत्या. ही सर्व जनावरे योग्य प्रकारे चरत नव्हते, चारा खात नव्हते आणि व त्यामुळे अशक्त झाले होते. मला माझ्या गावात रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवेद्वारे दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित पशुवैद्यकीय रोग निदान शिबिराबद्दल माहिती मिळाली. मी माझे सर्व आजारी जनावरे घेवून शिबिरात डॉक्टरांना दाखवले. डॉ. वी. न. देवगडे, पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, सिंदेवाही यांनी बैलांना जंताच्या गोळया दिल्या आणि 10 दिवस कॅल्शियमच्या गोळ्या देण्याचा सल्ला दिला. 

तसेच त्यांनी गाय, वासरु आणि बकरीचे निदान करून औषधे दिली. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे सर्वच जनावरे आजारातून बरे झाले आणि त्यांनी मोकळेपणाने चरणे आणि भरपूर पाणी पिणे सुरु केले. ही घटना माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी होती. गाय पुरेसे दूध देऊ लागली. त्यामुळे वासराला भरपूर दूध मिळू लागले व ते चांगलेच धष्टपुष्ट आणि सुदृढ बनले. वासराला भरपूर दूध पाजल्यावर आम्हाला घरगुती वापरासाठी रोज एक लिटर दूध देखील मिळू लागले. आमच्या रोजच्या दुधाची गरज भागू लागली; त्यामुळे माझे रोजचे ५० रुपये वाचू लागले. 

मी त्यांना बाहेर उपचारासाठी नेले असते, तर मला सुमारे रू. ५०००/- खर्च आला असता. हे सर्व उपचार अगदी योग्य वेळी, गावात येवून विनामूल्य करण्यात आले. त्यामुळे मला होणारा त्रास आणि जनावरांना बाहेरगावी दवाखान्यात नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च, माझी मजुरी व वेळ, डॉक्टरांची फी इ. चा  रू. २०००/- पर्यंतचा अतिरिक्त खर्चसुद्धा वाचला. रिलायन्स फाऊंडेशनने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
Previous Post Next Post