वर्धा । कोरोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू
वर्धा । येथील सावंगी रुग्णायात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, सदर सविस्तर घटना अशी कि, ही युवती मेंदूच्या बिमारीच्या कारणाने ८ मे ला उपचारा करीता दाखल झाली होती. त्यानंतर तिचे स्वाब घेऊन १० मे ला कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला होता.
सदर युवती कोरोना पॉजिटीव्ह असल्याने तिच्यावर तब्बल २६ दिवस उपचार सुरु होते परंतु तिचा आज मंगळवारी मृत्यू झाला.
⏩ हेही वाचा । वीज बिल माफ करावे : नागरिकांची मागणी
आई सह बहिणेचे रीपोर्ट सुद्धा पॉजिटीव्ह :
मृतक युवतीचे रिपोर्टचे पॉजिटीव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते त्यात तिच्या आई समवेत दोन बहिणीचे रिपोर्ट सुद्धा पॉजिटीव्ह आल्यानं कुटुंबातील चारही जण उपचार घेत होते.
रुग्णालयातून मिळणार होती सुट्टी :
कुटुंबातील चारही उपचार घेत असलेल्या रुग्णांना ४ दिवसां पूर्वी रुग्णायल प्रशासन सुट्टी देणार होते परंतु या युवतीची व तिच्या बहिणीची प्रकृती पुन्हा बिघडल्याने घरातील फक्त २ रुग्णांना सुट्टी दिली होती. सदर युवतीच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने शेवटी आज तिचा मृत्यू झाला.