तळेगांव श्यामजी पंत येथील काकडदरा वार्ड प्रतिबंधित क्षेत्र घोषित
प्रतिनिधी मयूर वानखडे :
वर्धा । जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तळेगाव शामजी पंत येथील वार्ड क्रमांक २ नवीन काकडदरा या भागातील निश्चित केलेल्या कंटेनमेंट भागातील रहिवासी असलेले व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हित व सुरक्षास्तव उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक त्यांनी पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
कंटेनमेंट क्षेत्र खालील प्रमाणे :
आष्टी तालुक्याचे हद्दीतील वार्ड क्रमांक २ नवीन काकडदरा
- उत्तरेकडील सरस्वती मनोहर यांचे घर ते दिलीप फडके यांचे घर
- पश्चिमेकडील श्री इंगोले यांचे घर श्री डेहनकर यांचे घर
- दक्षिणेकडील ग्रामपंचायत कार्यालय काकडदरा मागील बाजू
- पूर्वेकडे श्री इंगळे यांचे घर ते श्री मदारकर यांचे घर
- बफर क्षेत्र नवीन काकडदरा