![]() |
उपविभागीय अधिकारी यांना पत्रके स्वाधीन करताना विजय अजमिरे व कोरोना टास्क फोर्सचे पदाधिकारी |
कोरोना नोंदणी व माहिती पत्रके मोफत छापून केले वितरण
प्रतिनिधी राजेश सोळंकी :
वर्धा । सर्वत्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र लॉकडाऊन आहे शासनाने यात आता शिथिलता दिल्याने आर्वी तालुक्यात परत येणाऱ्याची ची संख्या दिवसेंदिवस वाढती वर आहे
जिल्ह्यातून, परराज्यातून, परप्रांतीय आर्वीत आल्यावर त्यांना त्यांची नोंद करणे व माहिती चा फॉर्म भरून त्यात सर्व माहिती देणे शासनाच्या नियमाप्रमाणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी माहितीपत्रके आणि बाहेरून येणाऱ्या लोकांकडून फॉर्म भरून घेणे अत्यावश्यक आहे
परिस्थिती ची जाणीव ठेवून ,कोरोना संदर्भातील भरून घ्यायचा माहिती फार्म, आणि माहिती पत्रके येथील आर्वी वृत्त चे संपादक ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विजय अजमिरे यांनी 25000 पत्रके छापून कोणतेही शुल्क न आकारता येथील विश्रामगृहात उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक व कोरणा टास्क फोर्स चे प्राध्यापक प्रशांत सव्वालाखे यांचे स्वाधीन केलीत
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता झोपाटे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर अरुण पावडे ,विनोबा भावे रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर श्याम भुतडा डॉक्टर दिवाकर ठोंबरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोहन सुटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदकिशोर कोल्हे नायब तहसीलदार विनायक मगर मुख्याधिकारी विद्याधर अंधारे गटविकास अधिकारी श्री जगदाळे आदींची उपस्थिती होती
सामाजिकतेची जाणीव ठेवून समाजाप्रती समाजाला अशा माध्यमातून निशुल्क सेवा दिल्याबद्दल विजय अजमिरे यांचे कोरोना टास्क फोर्सचे सर्व पदाधिकारी यांनी आभार मानले आहे.