वर्धा ब्रेकिंग । धक्कादायक पुन्हा ३ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह
प्रतिनिधी मयूर वानखडे :
वर्धा : काही दिवसापूर्वी आर्वी तालुक्यातील हिवरा या गावची महिला कोरोना पॉजिटीव्ह आढळल्याने वर्धा जिल्ह्याला गालबोट लागले होते; त्यामुळे आर्वी तालुक्याची संचारबंदी वाढवण्यात आली होती, आज असाच एक प्रकार पुन्हा समोर आला.
आर्वी तालुक्यातील जामखुटा येथील तब्बल एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती पॉजिटीव्ह आढळल्याने पुन्हा एकदा आर्वी तालुक्यात आणि विशेषतः वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सदर व्यक्ती दोघे पती पत्नी व २ मुले मुंबई येथून स्वतःच्या कार ने गावी आले असल्याची हिस्ट्री आहे त्यांना क्वारंटाईनं करण्यात आले होते. सदर रुग्णांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात मध्यरात्री भरती करण्यात आले असून परिवारातील ५ सदस्यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात आसोलेशन वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये मुंबई येथुन आलेल्या ४ जना पैकी तिघांचे नमुना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला असून वृत्तलिहेस्तोवर एकाच अहवाल येणे बाकी होता.