लॉकडाऊन ५ । देशात तब्ब्ल एक महिना पुन्हा लॉकडाऊन
दिल्ली : देशातील कोरोना ग्रस्थांची संख्या वाढत असून प्रशासन हतबल झालेले दिसत आहे. कोरोना रुग्णाची संख्या कमी व्हावी याच कारणाने संपूर्ण देशात २४ मार्च पासून लॉकडाऊन पुकारण्यात आला.
त्याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह मंत्रालयाने आज लॉकडाऊन ५ ची घोषणा केली. हा लॉकडाऊन तब्बल एक महिन्याचा असणार आहे, १ जुन ते ३० जून असा हा लॉकडाऊन ५ नव्या नियमावली सह केंद्रीय गृह मंत्रालयाने घोषित केला.
कसा असेल लॉकडाऊन ५ :
- कंटेंटमेंट झोन मध्ये संपूर्ण १ महिना लॉकडाऊन असेल
- प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवेला परवानगी असणार आहे
- रेड झोन बाहेर केंद्राने धार्मिक स्थळ, रेस्टोरेंट, हॉटेल सुरु करता येईल
- प्रवासाला कोणत्याही परवानगीची गरज नाही
- शाळा महाविद्यालय सुरु करायचा निर्णय जुलै मध्ये घेणार
- प्रतिबंधित क्षेत्र ठरविण्याचा निर्णय राज्याचा
- देशभरात रात्री ९ ते सकाळी ५ कर्फ्यू
यामध्ये धार्मिक स्थळ, रेस्टोरेंट, हॉटेल, शॉपिंग मॉल, दळणवळ, यांना ८ जून पासून परवानगी मिळणार आहे.