वर्धा जिल्हयातील CCI अंतर्गत कापूस खरेदी केन्द्र प्रारंभ - खासदार रामदास तडस

वर्धा जिल्हयातील सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केन्द्र प्रारंभ


वायगांव येथील सिंधानीया जिंनिंग येथे सीसीआय कापूस खरेदी केन्द्राला 
  खासदार रामदास तडस यांची सदिच्छा भेट


वर्धा: वर्धा जिल्हयात सुमारे 26 लाख क्विटंल कापसाचे उत्पादन झाले असुन कोरोनामुळे कापसाच्या सीसीआय खरेदी बंद होई पंर्यत अदांचे 19.50 लाख क्विटंल कापसाची खरेदी झालेली होती व शेतक-याकडे सुमारे 7 लाख क्विंटल कापुस शिल्लक असल्यामुळे शेतक-यांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. 

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व सीसीआय खरेदी केन्द्र बंद करण्यात आले होते.  बंद झालेले सीसीआय कापूस खरेदी केन्द्र सुरु करण्याकरिता केन्द्रीय वस्त्र मंत्री, सीसीआय चेअरमन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पनणमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या सतत पाठपुरावा केला, सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन वर्धा जिल्हयातील बहुतांश सीसीआय कापूस खरेदी केन्द्र सुरु झालेले असुन सोमवार पासुन सर्वंच सीसीआय खरेदी केन्द्र सुरु होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी वायगांच येथे सिंधानीया जिंनिग येथील सीसीआय अंतर्गत कार्यान्वित कापूस खरेदी केन्द्राला भेट देतांना व्यक्त केली. 

आज वायगांव येथे सिंधानीया जिंनिग येथील सीसीआय कापूस खरेदी केन्द्राला खासदार रामदास तडस यांनी भेट दिली, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, डीडीआर गौतम वालदे, जिंनिग मालक पवन सिंघानिया, अंकीत सिंघानीया, सचिव समीर पेडंके, सदस्य विजय बंडेवार, सदस्य मुकेश अळबपूर, सदस्य शरद झोड, सदस्य दत्ताजी महाजन, मिंलीद भेंडे, सीसीआय ग्रेडर बोखले व रमेशकुमार उपस्थित होते.

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात सर्वात जास्त कापुस उत्पादक शेतकरी आहे, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संपुर्ण देशात लाॅकडाऊन असल्यामुळे सीसीआय व बाजार समितीच्या वतीने खरेदी केन्द्र बंद होते त्यामुळे शेतक-यांचा कापुस घरीच शिल्लक असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, या अडचणी फायदा व्यापारी वर्ग कमी भावामध्ये कापुस खरेदी करीत होता, परंतु जिल्हयातील सर्वच सीसीआय कापुस खरेदी केन्द्र सुरु होणार असल्यामुळे शेतक-यांच्या कापसाला योग्य भाव मिळेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post Next Post