चेक पोस्टवर वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

धर्ती चेक पोस्ट वर बोलेरो पिकअप 

वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

 प्रतिनिधि : गौरव सोमकुंवर-

कारंजा :- कारंजा तालुक्यातील धर्ती चेकपोस्ट वर बोलेरो पिकअप वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना काल रात्री 12 ते 1 वाजताच्या च्या दरम्यान घडली आहे कोरोना विषाणूच्या प्रधुरभाव पाहता राज्यात जिल्हाबंदी चे आदेश आहे कोणीही छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करू नये यासाठी  जिल्ह्याच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

काटोल कारंजा या रोडवरील धर्ती गावाजवळ जिल्हा सीमेची चेकपोस्ट लावण्यात आली आहे काल रात्री 12 ते 1 च्या दरम्यान कारंजा मार्गावरून काटोल कडे जात असलेल्या बोलेरो पिकअप या वाहनाने  पोलीस कर्मचारी वासुदेव  तायवाडे वय 54 आर्वी पोलीस स्टेशन कार्यरत  हे  कारंजा काटोल मार्गावरील नागपूर - वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या धर्ती चेकपोस्ट वर आपले कर्तव्य बजावत असताना भरधाव वेगाने दोन अधण्यात बोलेरो पिकअप वाहनाने बॅरिकेट तोडून पसार झाले आहे 

यात वासुदेव तायवाडे यांना जोरदार  धडक लागल्याने  पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे  त्यांना काल कारंजा ग्रामीण रुगणल्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे धडक दिलेल्या अधण्यात वाहनाचा कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून  उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे व ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश मुंडे  व कारंजा पोलीस करीत आहे

Previous Post Next Post