डायल आऊट ऑडिओ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजना व करोना आजारसंबंधी मार्गदर्शन रिलायन्स फाउंडेशन नागपूर यांचा उपक्रम
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा नागपूर व कृषि विभाग नागपुर तालुका नरखेड़आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यान विद्यापीठ नागपुर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २५/४/२०२० रोजी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करोंना या आजाराच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांना शासकीय शेतीविषयक योजना करोंना आजार संबंधी माहिती व तसेच कापूस विक्री व इतर भाजीपाला व धान्य यांची विक्री व वाहतूक संबधी शेतकऱ्यांच्या अडचणी यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशन नागपुर येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री. धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी श्री. स्वराज कुमरे यांनी केले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन , श्री. योगराज जुमळे, तालुका कृषि अधिकारी नरखेड यांनी शेतकऱ्यांना कृषि विभागात असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा , तसेच करोंना आजारमुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करत असतांना सामाजिक अंतर जोपासणे महत्वाचे आहे असे सांगितले व , पी. एम. किसान योजना साठी तहसील कार्यालयला भेट द्यावी तसेच करोंना आजारमुळे लॉकडाउन असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना भाजीपाला मार्केट ला आणायचा असल्यास पास सेवा साठी तालुका कृषि विभाग येथून संपर्क साधावा असे सांगितले आणि शेतकऱ्यांचे कापूस विक्री बाबत अडचणी बद्दल मार्गदर्शन केले .
तसेच डॉ. सारिपुत लांडगे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी अंडी व चिकन यांच्या सेवनामुळे हा आजार पसरत नाही असे सांगितले तसेच नागपुर जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी दुधापासून तयार होणारे पदार्थ , ताक , दही , पनीर , तूप यासारखे पदार्थ बनवून आपले आर्थिक उत्पादन वाढवावे असे सांगितले .
शिवाय डॉ. गायकवाड़ यांनी करोना या आजाराची लक्षणे , उपाययोजना , हाथधुणे , स्यानीटाझर वापरणे , मास्क चा वापर करणे व सामाजिक दूरी जोपासून घरी राहणे यावर मार्गदर्शन केले . या प्रसंगी नागपूर जिल्यातील काटोल, कलमेश्वर,नरखेड़ येतील ४० शेतकरी सहभागी होते.तज्ञांनी व शेतकऱ्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले .