मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स उलटली
प्रतिनिधि गौरव सोमकुंवर :
कारंजा :- राष्ट्रीय महामार्ग सहा वरून अमरावती वरून नागपूर दिशेने जात असलेल्या ट्रॅव्हलस उलटल्याची घटना आज सकाळी साडेपाच च्या दरम्यान घडली मिळालेल्या माहिती नुसार 50 प्रवाशी गुजरातच्या सुरत वरून ओडिशा येथे मजुरांना घेऊन जात असताना राष्टीय महामार्गावर कुत्रा आडवा गेल्याने ट्रॅव्हल्स क्र. GJ 14 Z 2511 ही अनियंत्रित होऊन रोडच्या बाजूला जाऊन उलटली यात ट्रॅव्हल्स मधील तीन मजूर जखमी झाले.
त्यांना कारंजा टोल प्लाझा च्या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र सोबतीला असलेल्या मजुर आणि चालक दुसऱ्या वाहनाने पसार झाले आहे हा अपघात होताच कारंजा पोलीस स्टेशन चे कर्मचारी नीरज लोही व सुनील बेले यांनी घटस्थळ गाठलं या घटनेचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.