हरियाना येथे अडकलेले नवोद्यय विद्यालयाचे
21 विद्यार्थी व शिक्षक वर्धा कडे रवाना
खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नांना यश
वर्धा: जवाहर नवोदय विद्यालय सेलू (काटे) जिल्हा वर्धा येथील 9 व्या वर्गातील 11 विद्यार्थी व 10 विद्यार्थीनी एकुण 21 विद्यार्थी नॅशनल इंटीग्रीटी कार्यक्रमांतर्गत मायग्रेशन स्किम मध्ये हरियाणा राज्यातील जवाहर विद्यालय बुटाना जि. सोनीपत येथे गत जुन महिण्यापासून एक वर्षासाठी गेलेले होते, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषीत झाल्यामुळे विद्यार्थी सोनीपतमध्ये अडकलेले होते,
सर्व विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळे त्यांनी घरी वापस पाठवण्याची विनंती विद्याथ्र्यांनी विविध माध्यमातुन तसेच पालकांनी खासदार रामदास तडस यांच्याकडे विनंती केली पालकांच्या विनंती वरुन खासदार रामदास तडस यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. मनोहर लाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, केन्द्रीय गृह राज्यमंत्री श्री. जी किशन रेड्डी यांना हरियाणात अडकलेले नवोदय विद्यालयातील 21 विद्यार्थ्यांची वर्धा येथे आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत विनंती केली होती. खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन आज दिनांक 02/05/2020 दुपारी 2.10 वा बुटाना सोनीपत येथून टॅवल्स बस क्र. एच आर-69 डी-4532 या बसने रवाना झालेले असुन दिनांक 03/05/2020 ला दुपारी 12.00 जवाहर नवोदय विद्याालय सेलू वर्धा येथे पोहचणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे येथील 9 व्या वर्गात शिकणारे विद्यार्थी उदय घुटे, प्रज्वल मैदापवार, प्रतिक डेहनकर, विनय पाटील, विवके चरडे, वेदांत निम्बेकर, देवांग काले, संकेत तेलंग, अनुज सातपुते, गौरव गवळी, साहील परतेकी, कु. श्रृतिका लोखंडे, कु. समिक्षा किनकर, कु. खुशी लाजुरकर, सुहानी द्रुगवार, कु. भाविका शेंडे, कु अनुश्री इंदूरकर, कु आर्या मतले, कु करीना सराटे, कु मयुरी कंगाले, कु स्नेहा आ़त्राम व कला शिक्षक सुनिल चांदूरकर, श्रीमती लता मानकर, सौ चांदूरकर सोबत बस चालक प्रमोद कुमार व ग्यानेद्र सर्व बुटाना जिल्हा सोनीपत येथून वर्धा कडे रवाना झालेले आहे, सर्वानी वर्धा येथे परत आणण्याकरिता प्रयत्न केल्याबद्दल खासदार रामदास तडस यांचे आभार मानले.
जवाहर नवोद्य विद्यालय सेलू (काटे) येथील 9 व्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांना हरियानातून वर्धा येथे आणण्याकरिता केन्द्र व दोन्ही राज्य सरकारला पत्र पाठवून विनंती केली होती, माझ्या विनंतीला मान देवून सर्व विद्याथ्र्यांना वर्धा येथे वापस पाठविण्याकरिता विशेष बसची व्यवस्था करुन दिल्याबद्दल व मोलाचे सहकार्य केल्याबद्दल हरियानाचे मुखमंत्री श्री. मनोहर लाल जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे, केन्द्रीय गृह राज्यमंत्री श्री. जी किशन रेड्डी यांचे खासदार रामदास तडस यांनी आभार व्यक्त केले.