आमदाराचे नाव सांगून सिंधी समाजाकडून केले 50 हजार जमा

आमदाराचे नाव सांगून सिंधी समाजाकडून केले 50 हजार जमा

आमदार दादाराव केचे यांचे नाव सांगून 
सिंधी समाजाकडून केले 50 हजार जमा कार्यवाही ची मागणी 

आर्वी  : आमदार दादाराव केचे यांनी सिंधी समाजाला 50 हजार रूपयाची किट मागितले त्यांना ते पैसही  देण्यात आले मात्र ही मदत वैयक्तिक सिंधी समाजातील एकाच व्यक्तीला मागण्यात आली होती.

त्या व्यक्तीने याचा बाऊ करीत सिंधी समाज बांधवांकडून पैसे जमा करून ते पैसे उकळले ? या व्यक्तीवर कार्यवाही करण्याची मागणी अध्यक्ष सचिव गुरुनानक धर्मशाळा यांना तक्रारी द्वारे करण्यात आली आहे विष्णू नारायण आहूजा आणि कैलास प्रतापचंद्र मोटवानी आदी पाच जणांनी ही तक्रार गुरुनानक धर्मशाळा समितीकडे केली आहे.

मनोहर फेरूमल मोटवानी यांना आमदार दादाराव केचे यांनी 1000 किटबाबतीत मदत करण्याची मागणी केली होती परंतु मनोहर फेरूमल मोटवानी यांनी सुखदेव गोकुलदास लालवानी आणि सुनील दयाराम वछानी या दोघांना हाताशी धरून सिंधी समाजात फिरून सिंधी समाजातील अनेक व्यक्ती कडून आमदार दादाराव केचे यांच्या नावाखाली  50 हजार रुपये गोळा केले. 

परंतु महत्वाची बाब अशी की आमदार केचे यांनी  सिंधी बांधव समाजाकडून पैसे घ्यायलाच लावले नाही?  मागायची असते तर  सरळ पने मदत मागितली असती? असे तक्रारकर्त्यानी  फोनवरून माहिती घेऊन सांगितले

यासंदर्भात या पैसे उकळणाऱ्या सिंधी समाजातील या व्यक्तिनि आपल्या स्वार्थासाठी आपल्याच समाजाशी खोटे बोलून पैसे उकलले ? आणि आपले स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी स्वताच आमदार केचे यांना 50 हजार दिले या व्यक्तीवर कार्यवाही व्हावी असे निवेदनात नमूद केले आहे.

Previous Post Next Post