वर्धा । कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ टोटल रुग्ण ७
प्रतिनिधी मयूर वानखडे :
वर्धा : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णाची संख्या वाढतच असताना आज अजून एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे, सदर रुग्ण बाहेरचा असून हा मजूर मुंबई ते गोरखपूर असा प्रवास करीत होता.
सदर सविस्तर घटना अशी कि, एक मजुरांनी भरलेला ट्रक मुंबई हुन गोरखपूरला जाण्यासाठी निघाला होता, त्यामद्ये एका वृद्ध मजुराला ताप आला आणि तब्बेत जास्त बिघडल्याने ट्रक चालकाने कारंजा घाडगे नजीक सारवाडी जवळ उतरून दिले सोबत एक व्यक्ती अजून उतरला आणि ट्रक पुढील प्रवासा करिता निघाला.
त्या वृद्द इसमावर कोणताही इलाज करायच्या आधीच त्याचा मृत्यू झाला; आणि त्याचे कोणतेही नमुने घेतल्या गेले नाही, प्रशासनाच्या वतीने त्यांच्या वर तिथेच अंत्यविधी उरकण्यात आला.
सोबतच्या व्यक्तीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचे नमुने चाचणी करण्यासाठी पाठविले असत्या त्या दुसऱ्या इसमाचे कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या वतीने ट्रक चा शोध घेणे सुरु झाले असून गोरखपूर प्रशासनाला सुद्धा कळविण्यात आले आहे.
वर्ध्यात कोरोनो रुग्णाची संख्या ७ झाली असून पॉजिटीव्ह रुग्णांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे.