शेतकरी व पशुपालकांना तंत्रज्ञांनाच्या माध्यमातून मार्गदर्शन

शेतकरी व पशुपालकांना तंत्रज्ञांनाच्या माध्यमातून मार्गदर्शन

“शेतकरी व पशुपालकांना तंत्रज्ञांनाच्या माध्यमातून मार्गदर्शन”

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, व रिलायन्स फाऊंडेशन माहीत सेवा चंद्रपूर व कृषि विभाग चंद्रपूर तसेच पशुसंवर्धन विभाग सिंदेवाहि यांच्या संयुक्त विद्यमाने ता.सिंदेवाहि चंद्रपूर जिल्यातिल शेतकरी आणि पशुपालकांना डायल आऊट ऑडिओ कॉन्फरन्स च्या साहिय्याने दि.२९/०४/२०२० ला मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक करोंना आजाराच्या पऱ्शोभूमीवर चंद्रपूर जिल्यामध्ये लॉकडाऊन असल्या मुळे शेतकरी व पशुपालकांना त्यांचा समस्या सोडवीण्या करीता व त्यावर मार्गदर्शन मिळवण्या करीता रिलायन्स फाऊंडेशन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री धम्मदीप गोंडाने व जिल्हा प्रतिनिधी अमित मेश्राम यांनी केले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणुन डॉ सारीपुत लांडगे, सहाय्यक प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, तथा तांत्रिक अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, यांनी पशुपालकांना करोंना हा आजार अंडी व चिकन यांचे सेवन केल्यामुळे होत नाही असे सांगितले

तसेच शेळी पालन व कुकुट पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यानी जोंडधंदा म्हणुन बघितले पाहिजे , तसेच शेळी व कुकुट पालन यामुळे शेतकऱ्याना किती फायदा होऊ शकतो यांचे आर्थिक समीकरण सुद्धा पटवुन दिले. शिवाय गाईच्या दुधा पासून तयार होणारे पदार्थ , जसे तूप,ताक, दही, पनीर यांना पन बाजारात मागणी असते त्यामुळे शेतकऱ्यानी या व्यवसायाकडे वळले पाहिजे व त्यांची आर्थिक उन्नती साधली पाहिजे असे सांगितले. शिवाय त्यांची उन्हळ्यात जनांवराचे व्यवस्थापन कसे करावे यावर सुद्धा संविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. संतोष गवारे , पशुधन विकास अधिकारी सिंदेवाहि यांनी पशु संबंधी शासनाच्या विविध योजना व पशु लसीकरण तसेच पशू लासिकरणांचे महत्व व पशू चे उन्हाड्यातिल पाणी व गोठ्याचे व्यवस्तापन या संबंधी संविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गायकवाड गुरु कृपा क्लिनिक नागपूर यांनी करोना आजार म्हणजे काय ,त्याची लक्षणे ,सामाजिक अंतर ,घरी राहणे ,हात धूणे ,स्यानिटाइझर व मास्क यांचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले . 
तसेच श्री उदय पाटील. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विभाग चंद्रपूर यांनी यांनी शेतकऱ्यांना कृषि विभागात असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा , तसेच करोंना आजारमुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करत असतांना सामाजिक अंतर जोपासणे महत्वाचे आहे असे सांगितले. तसेच जिल्हास्तरावर असलेल्या विविध शासकीय शेतीविषयक योजना जसे गोपीनाथ मुंडे शेतकरी उपघात विमा योजना , प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना , एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम ‘ फळबाग लागवड योजना’ , व कृषि यांत्रिकीकरण योजना तसेच खरीप धान पीक व्यवस्तापण यावर मार्गदर्शन केले .   

या प्रसंगी चंद्रपूर जिल्यातिल सिंदेवाहि, चिमुर, आणि वरोरा, येथील १२ गावातील एकूण ४० शेतकऱ्यानी या ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला व मिळालेल्या माहिती मुळे शेतकऱ्यानी तज्ञांनी रिलायन्स च्या या
उपक्रमाचे कौतुक केले.

शेतकरी व पशुपालकांना तंत्रज्ञांनाच्या माध्यमातून मार्गदर्शन

Previous Post Next Post