अमरावती । धक्कादायक कोरोना रुग्ण संख्या पोहचली २१० वर
अमरावती । जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज पर्यंत हि रुग्ण संख्या तब्बल २१० वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात लोकडाऊन नंतर किती तरी दिवस एकही रुग्ण नव्हता परंतू पाहता पहाता एक एक रुग्ण वाढतच गेला आणि हि रुग्ण संख्या तब्बल २१० वर जाऊन पोहचली.
ग्रीन ते रेड झोन :
सुरुवातीला जिल्हा कोरोना मुक्त होता त्यामुळे तो ग्रीन झोन मध्ये समाविष्ट होता नंतर कालांतराने जिल्ह्याची वाटचाल ऑरेंज झोन कडे तर आता मात्र जिल्हा रेड झोन मध्ये गेला आहे.
बरे होऊन घरी गेले ११९ रुग्ण :
जिह्यात कोविड रुग्णायात उपचार सुरु असलेल्या रुग्ना पैकी ११९ रुग्ण कोरोना वर मात करू घरी परतले आहे.
तर अमरावती मध्ये १५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अजून ७०+ रुग्ण ऍक्टिव्ह पॉजिटीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.