जनावरांनकरीता चारा छावण्या उघडा- खासदार नवणीत राणा यांची मागणी
कोरोना संक्रमन जोखमीचे दिवस व उन्हाळ्याचे दिवस बघता, अमरावती जिल्ह्यातील, अमरावती शहरामध्ये लॉकडाऊन मुळे खाजगी दुकाने बंद आहेत त्यामुळे जनावरांना चारा व पशू खाद्य उलब्ध होऊ शकत नाही यामुळे शेतकऱ्या कडे असलेले व शेतमजूरा कडे असलेले जनावरे उदा. गाई, म्हशी, शोळी, मेंढी, इ. जनावरांचे भुकेने हाल होत आहेत म्हणून या गोष्टीची जाणीव ठेऊन अमरावती जिल्हाच्या खा. सौ. नवणीत रवी राणा यांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन अमरावती यांच्याशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली व त्यांना कडबाकुट्टी व पशुखाद्याची दुकाने ताबडतोब उघडण्यात यावीत अशा सूचना दिल्या आहे.
खा. सौ. नवणीत राणा यांनी जिल्हा उपआयक्त पशुसंवर्धन अमरावती यांना विशेषत: शेतकरी व शेतमजूर आर्थिक टंचाईत असल्यामुळे त्यांच्या जनावरा करीता चारा,छावण्या उघडण्याची कार्यवाही तातडीने करावी अशी खा. नवणीत राणा यांनी त्यांना सूचीत केले त्या अनषंगाने खा. नवणीत राणा यांच्या मागणीचा संदर्भ घेऊन जिल्हा आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाअधिकारी अमरावती यांचे कडे दी. २७/०४/२०२० रोजी सदर चा प्रस्ताव जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन अमरावती यांनी मा. जिल्हाअधिकारी यांचे कडे सादर केला आहे.
आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये खा. नवणीत राणा यांनी उपस्थित असलेले मा. जिल्हाअधिकारी यांचे सोबत पाठविलेल्या प्रस्तावाला मंजूरी देण्याची मागणी करणार आहे सचिव उमेश ढोणे यांचे कडे प्रस्तावाची पाठपुरावा करण्या ची जबाबदारी दिली आहे .