महाराष्ट्रदिन साधेपणाने; केवळ जिल्हा मुख्यालयातच होणार ध्वजारोहण

महाराष्ट्रदिन साधेपणाने; केवळ जिल्हा मुख्यालयातच होणार ध्वजारोहण

महाराष्ट्रदिन साधेपणाने; केवळ जिल्हा मुख्यालयातच होणार ध्वजारोहण

अमरावती, दि. 30 : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी विविध सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी राज्यभर होत आहे. त्यानुषंगाने उद्या (1 मे) महाराष्ट्रदिनाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून, केवळ जिल्हा मुख्यालयातच ध्वजारोहण होणार आहे.   

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापनदिन समारंभ जिल्हा मुख्यालयात उद्या अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होईल. जिल्हा मुख्यालयाशिवाय इतरत्र ध्वजारोहण समारंभ होणार नाही.

राज्यातील मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी या ठिकाणी एकाचवेळी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात यावे. या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त/अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एवढ्याच पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित राहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. कवायतीचे आयोजन करण्यात येऊ नये,  असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे.

विधीमंडळ, मा. उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Previous Post Next Post