Fenugreek cultivation I मेथी लागवड I मेथीच्या भाजीचे दीड एकरात विक्रमी उत्पादन !

Fenugreek cultivation I मेथी लागवड I मेथीच्या भाजीचे दीड एकरात विक्रमी उत्पादन !


देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव महि येथील अल्पशिक्षित असलेल्या युवा शेतकरी दत्तात्रेय शिंगणे,  फक्त दहावी पर्यंत शिकलेले,  त्याच्याकडे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे,  शेती करायला घरी कोणी नव्हते लहान भाऊ शिक्षण घेत असल्याने शेती सांभाळायची जबाबदारी संपूर्ण दत्तात्रय शिंगणे यांच्याकडे आली शेतात पारंपरिक पिके घेत असताना शेती परवडत नसल्याने त्यांनी काही इतर ठिकाणी खाजगी कामे सुद्धा केली.  मात्र तेथेही घरखर्च भागत नसल्याने दत्तात्रेयाने आपली शेती करण्याचे ठरविले,  तीन ते चार वर्षांपूर्वी परिसरात खडकपूर्णा प्रकल्प झाल्याने पारंपरिक पिकांसोबत भाजीपाला गहू हरभरा मका आदि पिके घेण्यास सुरवात केली. 

त्यांनी बाजारातून दीड क्विंटल मेथीच्या भाजीचे बी आणले आणि ते दीड एकर शेतीमध्ये टाकले सुरुवात झाल्यावर आणि त्याची मशागत करत असताना पाणी आणि खत दिले. अवघ्या महिनाभरात मेथीचे पिक एवढे आले कि मेथीची शेती हिरवीगार दिसायला लागली,  शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी मेथी काढायला आल्यावर व्यापाऱ्यांना मेथीची भाजी शेतात आणून दाखविली. आणि इतर व्यापाऱ्यांनी यांच्याकडे मागणी केली परंतु एका व्यापार्‍याने दत्तात्रय शिंदे यांच्या शेतातील मेथी भाजी चांगली आलेली पाहून त्यांना दीड लाख रुपयात विकत घेतली.


संपूर्ण व्हिडिओ बातमी पहा : 



व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला सब्स्क्राइब करा. आणि बेल बटन प्रेस करा. 


Previous Post Next Post