
आरोग्य, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय यांच्याशी संबंधित ग्रामीण क्षेत्रातील व्यवसाय व उद्योग सुरु करण्यास मान्यता.
वर्धा, दि.21 राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. मात्र काही व्यवसाय व उद्योग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी सुध्दा काही क्षेत्र प्रतिबंधीत करुन आरोग्य, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय यांच्याशी संबंधित ग्रामीण क्षेत्रातील व्यवसाय व उद्योग सुरु करण्यास आज जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग पसरु नये हयाकरीता उपाययोजना विषयी एकत्रीत सुधारीत मार्गदर्शक सुचना अशा आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत प्रतीबंधीत असणा-या सेवा याप्रमाणे राहतील (दिनांक 03 मे , 2020 पावेतो)
1. सुरक्षेच्या उदेशाशिवाय रेल्वे मधुन सर्व प्रवासी हालचाल बंद राहील.
2. वैद्यकिय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळुन आंतर जिल्हा व आंतर राज्य हालचाली करीता बंदी राहील.
3. सर्व शैक्षणिक प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग बंद राहतील.
4. या मार्गदशक्क तत्वानुसार विशेष परवानगी असलेल्या संस्था व्यतीरीक्त इतर सर्व औद्यगिक व वाणिज्यक आस्थपना बंद राहतील.
5. या मार्गदर्शक तत्वानुसार विशेष परवानगी असल्याशिवाय अतिथ्य सेवा बंद राहील.
6. टॅक्सी (ॲटोरिक्षा आणि सायकल रिक्षासह ) आणि कॅब अग्रीग्रेटरच्या सेवा.
7. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, व क्रिडा कॉम्पलेक्स, जलतरण तलाव, मनोंरजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे.
8. सर्व सामाजिक /राजकिय / खेळ /करमणुक /शैक्षणिक /सांस्कृतीक /धार्मीक कार्य/ इतर मेळावे.
9. सर्व धार्मीक स्थळे/ पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच धार्मीक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी राहील.
10. अंत्यविधी सारख्या प्रसंगी विस पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी दिली जाणार नाही.
लॉकडाऊनच्या कालावधीत मार्गदर्शर्क तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी.
1. सर्व आरोग्य सेवा (Ayush सह) सुरु राहतील. (ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.)
a. रुग्णालये, नर्सींग होम , क्लिनीक, टेलिमेडीसीन्स सुविधा
b. डिस्पेन्सरीज केमिस्ट, ओषधी दुकाने, (जन औषधी केंद्र आणि वैद्यकिय सहित्यांचे दुकानासह)
c. वैद्यकिय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्र.
d. COVID-19 च्या संबधाने औषध व वैद्यकिय संशोधन प्रयोगशाळा , संस्था.
e. पशुवैद्यकिय रुग्णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथालॉजी लॅब, लस व ओषधाची विक्री व परवठा.
f. अधिकृत खाजगी आस्थापने जी COVID-19 च्या आवश्यकतेच्या सेवांच्या तरतुदीसाठी किंवा हा आजार रोखण्याच्या प्रयत्नाना समर्थन देतात ज्यात होमकेअर प्रदाते, डायग्नेास्टिक रुग्णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म तसेच सेवा देणारे रुग्णालये,
g. ओषधे, फार्मसुटीकल्स, वैद्यकिय उपकरणे, वैद्यकिय ऑक्सीजन, तसेच त्यांचे पॅकेजींग साहित्य, कच्चा माल आणि मध्यवर्ती उत्पादन युनिटस.
h. रुग्णवाहीका निर्मीतीसह वैद्यकीय / आरोग्याच्या पायाभुत सुविधांचे बांधकाम.
i. वैद्यकिय आणी पशुवैद्यकिय व्यक्ती, वैज्ञानिक , परिचारिका, पॅरामेडीकल स्टॅफ, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ दाई आणि इतर आरोग्य विषयक सेवा (ॲम्बुलंससहीत)
2. कृषी व कृषी संबधीत कामे.
1. शेती व फळाबाग संबधीत सर्व कामे पुर्णपणे कार्यरत राहतील.
a. शेतामध्ये शेतकरी व शेतमजुर यांना शेतीविषयक कामे करण्यास मुभा राहील.
b. कृषी उत्पादने खरेदी करणाऱ्या यंत्रणा तसेच शेतमांलाची उद्योगाद्वारे, शेतकऱ्यांद्वारे, शेतकरी गटाद्वारे, किंवा शासनाद्वारे होणारे थेटविपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे सुरु राहतील.
c. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मंडी किंवा महाराष्ट्ऱ
शासनाने अधिसुचित केलेल्या मंडी सुरु राहतील.
d. शेतीविषयक यंत्राची व त्यांचे सुटे भाग विक्री व दुरुस्ती करणारे दुकाने हे त्यांच्या
पुरवठा साखळीसह सुरु राहतील.
e. शेती करीता उपयोगात येणारे भाडेतत्वावरील अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स.
f. रासायनिक खते, किटकनाशके, व बी-बियाणे यांचे उत्पादन वितरण व किरकोळ विक्री सुरु राहील.
g. शेतमालाची काढणी व पेरणी करणाऱ्या मशीन्स जसे कम्बाईनड हार्वेस्टर आणि
इतर कृषी अवजाराची राज्याअंतर्गत व आंतर राज्य वाहतुक सुरु राहील .
2. मासेमारीच्या अनुषगांने असलेले सर्व व्यवसाय सुरु राहतील.
a. मासेमारीव अनुषंगीक व्यवसायाकरीता वाहतुकीची मुभा राहील.
3. पुशवैद्यकिय विभागाशी संबधीत कामे सुरु राहतील.
a. दुध संकलन करणे त्यावर प्रक्रिया करणे, त्याचे वितरण व विक्री इ . कामे सुरु राहतील.
b. पुशपालन , कुकटपालन व अनुषंगिक कामे सुरु राहतील.
c. जनावरांच्या छावण्या व गोशाळा सुरु राहतील.
4. आर्थिक बाबीसी संबधीत कामकाज सुरु राहील.
अ) बॅकांना दिलेल्या वेळेनुसार बॅक सुरु राहतील.
ब) स्थानिक शासनाने बॅकामध्ये सुरक्षा रक्षक नेमावे, तसेच बॅक कर्मचारी व ग्राहक याचेकडुन सामाजिक आंतर (social Distancing) तसेच कायदा व सुव्यवस्था राखले जाईल या प्रमाणे कार्यवाही करावी.
5. सामाजिक क्षेत्र .
A. लहान मुले, दिव्यांग, मतिमंद , जेष्ठ नागरीक , महिला, विधवा यांचे सबंधी चालविण्यात येणारी निवारागृहे
B. लहान मुले यांचेसाठी चालविली जाणारी निरीक्षण गृहे, संगोपन केंद्र व सुरक्षा गृहे.
C. अंगणवाडी संबधित कामे जसे कि पोषण आहाराचे घरपोच वाटप, लाभार्थी अंगवाडी मध्ये येणार नाही.
6. ऑनलाईन शिक्षण/ दुरस्थ शिक्षणाला प्रोत्सहान देण्यात यावे.
A. सर्व शैक्षणिक प्रशिक्षण , शिकवणी , संस्था बंद राहतील.
B. तथापी या वरील संस्थानी ऑनलाईन अध्यापनाव्दारे त्यांचे शैक्षणिक सत्र सुरु ठेवावे.
C. शिक्षणासाठी शैक्षणीक वाहीन्या व दुरदर्शन यांचा वापर करावा.
1. मनरेगा मधुन द्यावयाची कामे.
a. सामाजिक अंतर व तोंडाला मास्क् लावणे या बाबीची कडक अंमलबजावणी आदेशीत करुन मनरेगाची कामे मंजुर करावी.
b. मनरेगा मधुन सिंचन व जलसंधारणाची कामांना प्राधान्य देण्यात यावे.
c. पाटबंधारे आणि जलसंधारण क्षेत्रातील इतर केंद्र आणि राज्य योजनांनाही मनरेगा कामांशी सांगड घालुन आंमलबजावणी करण्यास मुभा राहील.
2. सार्वजनिक सुविधा
a. पेट्रोल, डिझेल, एल.पी.जी .गॅस यांची वाहतुक वितरण साठवण व किरकोळ विक्री सुरु राहील.
b. राज्यामध्ये विज निर्मीती, विज पारेषण व विज वितरण या बाबी सुरु राहतील.
c. पोस्ट ऑफीस संबधीत सर्व सेवा सुरु राहतील.
d. पाणी , स्वच्छता , घनकचरा व्यवस्थापन, बाबतची कार्यवाही या बाबतच्या सुविधा नगर परीषद स्तरावर सुरु राहतील.
e. दुरसंचार व इंटरनेट या सेवा सुरु राहतील.
3. वाहतुक (माल चढविणे, उतरविणे इत्यादी मालवाहतुकीबाबत सुचना )
a. वाहतुक करणारी ट्रक त्या सोबत दोन वाहन चालक व एक मदतनीस असावा, मालवाहतुकीसाठी जाणारे खाली ट्रक किंवा मालवाहतुक करुन परत जाणारे खाली ट्रक यांना सुध्दा परवानगी राहील. वाहनचालक यांनी वाहन चालविण्याचा परवाना सोबत ठेवणे बंधनकारक राहील.
b. राज्य शासनाने ठरवुन दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावर ट्रक दुरुस्ती व ढाब्यांची दुकाने सुरु राहतील.
4. जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरु राहील.
a. जिवनावश्यक वस्तुंच्या पुरवठयांमधील सर्व सुविधा सुरु राहतील.
b. जिवनावश्यक वस्तु विकणारे प्रतिष्ठा़न धान्य व किराणा, फळे व भाज्या, दुधाची दुकाने, अंडे, मास , मासे, पशुखाद्य व गुराचा चारा, विक्रीची दुकाने सुरु राहतील, सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात यावा.
c. घरपोच सेवा देण्याबाबत जास्तीत जास्त कार्यवाही करण्यात यावी जोणे करुन कुठेही गर्दी होणार नाही.
5. सुरु असणा-या व्यापारी व खाजगी अस्थापना.
a. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया, डीटीएच व केबल वाहिनी सेवा .
b. माहिती व तंत्रज्ञानाच्या सेवा 50 टक्के कर्मचाऱ्यासंह सुरु राहतील.
c. शासकीय कामा करीता डाटा आणि कॉल सेंटर सुरु राहतील.
d. ग्राम पंचायम स्तरावरील सामान्य सेंवा केंद्र सुरु राहतील.
e. कुरीअर सेवा.
f. शितगृह आणि वखार महामंडाची गोदामे सुरु राहतील.
g. कार्यालय आणि निवासी संकुलांची देखभाल आणि देखभाल करण्यसाठी खाजगी सुरक्षा सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा.
h. लॉकडाउनमुळे , वैद्यकिय व आपत्कालीन कर्मचारी व अडकलेल्या पर्यटक आणि व्यक्तीसांठी हॉटेल, लॉज सुरु राहतील.
i. सेवा देणार व्यक्ती जसे इलेक्ट्रीशीयन, संगणक / मोबाईल दुरुस्ती, वाहन दुरुस्ती करणारे केंद्र , नळ कारागीर (प्लंबर), सुतार.
6. उद्योग / औद्यगिक आस्थपनांना (शासकीय व खाजगी) याप्रमाणे मुभा राहील.
a. नगर परीषद हदृीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग,
b. औद्योगिक आस्थापना मध्ये कामगांरांना कामाचे ठिकाणी पोहचविण्याची व्यवस्था सामाजिक अंतराच्या नियमाची अंमलबजावणीकरुन कंत्राटदारने करावी.
c. जिवनावश्यक वस्तुचे उत्पान करणारे युनिटस, जसे औषधी उत्पाने/वैद्यकिय उपकरणे त्या संबधी लागणारा कच्चा माल.
d. ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योग.
e. उत्पादन करणारे युनिट ज्यांना सतत प्रक्रिया आणि त्यांची पुरवठा साखळी आवश्यक असते.
f. आय . टी हार्डवेअर चे उत्पादने
g. कोळसा उत्पादन खाणी, व खनिज उत्पादन त्याची वाहतुक तसेच विस्फोटकांचा पुरवठा आणि प्रासंगिक खाण कामे.
h. पॅकेजीग सामग्रीचे उत्पादन युनिट
i. ताग उद्योग जेथे पाळीने काम चालते या मध्ये सामाजिक अंतराच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी.
j. नगर परीषद / नगर पंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण भागातील विटभटृी.
7. बांधकामास याप्रमाणे परवानगी देण्यात येत आहे.
a. नगर परीषद, / नगर पंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण क्षेत्रातील रस्ते , सिंचन प्रकल्प, इमारीतीचे बांधकाम तसेच सर्व प्रकारचे औद्यगिक प्रकल्पाचे बांधकाम सुरु राहतील.
b. नविनीकरण उर्ज प्रकल्पाचे बांधकाम.
c. नगर परीषद, / नगर पंचायत हदृीतील सुरु असलेली बांधकामे जेथे मजुर उपलब्ध आहे व बाहेरुन मजुर आणण्याची गरज पडणार नाही अशी कामे सुरु राहतील.
8. व्यक्तींना हालचाली करण्यास परवानगी आहे.
a. आपात्कालीन सेवासांठी वैद्यकिय आणि पशुवैद्यकिय सेवा आणि आवश्यक वस्तु खरेदीसाठी खाजगी वाहने अशा परिस्थितीत चारचाकी वाहनांच्या बाबतीत खाजगी वाहन चालकाव्यतरिीक्त एका प्रवाशाला परवानगी दिली जाऊ शकते, मात्र दुचाकी वाहनांच्या बाबतीत केवळ वाहन चालकास परवानगी असेल.
b. जिल्हा प्रधिकरणाच्या सुचनेनुसार कामाच्या ठिकाणी जाणारे व कामावरुन
येणारे सर्व कर्मचारी
9. सुरु असणारी केंद्र शासनाचे कार्यलये.
a. आरोग्य कुटूंब कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा सुचना विज्ञान केंद्र, एन,सी. सी, नेहरु युवा केंद्र
10. सुरु असणारी राज्य शासनाचे कार्यलये.
a. पोलीस , होमगार्ड, अग्निशमण, आपतकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृहे आणि नगर / परीषद/ नगर पंचायत कोणत्याही निर्बंधा शिवाय सुरु राहतील.
b. राज्यशासनाच्या इतर खात्याचे वर्ग अ आणि वर्ग ब चे अधिकारी अवश्यकतेनुसार कार्यालयात उपिस्थित राहतील तसेच गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या 33 टक्के उपस्थितीने कार्यालये सुरु राहतील, पंरतु सदर कर्मचारी यांनी सामाजिक अंतर पाळुन काम करतील, तथापी असे असेल तरी सामान्य जनतेला पुर्ण सेवा मिळेल याची खात्री करावी.
c. जिल्हा प्रशासन व कोषागार ही कार्यालये निर्बंधीत कार्मचारी संख्येने सुरु राहतील.
d. तथापी सर्वजनिक सेवा उपलब्ध होईल, याची खात्री करावी व त्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग नेमलेला असावा.
e. वन कार्यालये कर्मचारी, प्राणीसंग्रहालय , रोपवाटीका, वन्यजीव, जंगलातील वणवा/ आगी निंयत्रण करणारी यंत्रणा , वृक्षारोपण , गस्त घालणे, इत्यादी कामे.
a. विलगीकरणामध्ये राहणाऱ्या व्यक्ती.
b. स्थानीक आरोग्य प्रधिकाऱ्यांने त्यांनी दिलेला कालावधी करीता घरगुती विलगिकरण/ संस्थात्मक विलगीकरणात राहण्याबाबत सुचित केलेल्या व्यक्ती.
c. विलगीकरणाचा नियम तोडणाऱ्या व्यक्ती विरोधात भारतीय दंड सहिंता 1860 चे कमल 188 अन्वये कारवाई करण्यात यावी.
d. दिनांक 15/02/2020 नंतर भारतामध्ये आलेले परंतु विलगिकरणात असलेल्या सर्व व्यकती, त्यांच्या विलगिकरणाचा कालावधी संपला आहे व तपासणी नंतर ते पुन्हा COVID-19 निगेटिव्ह आलेला आहे, अशा विलगिकृत व्यक्तींना गृहमंत्रालय, भारत सरकारने निर्गमित केलेल्या SOP नुसार सुट्टी देण्यात यावी.
11. लॉकडाऊन बाबत सुचना.
a. या आदेशाच्या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड-19 संबधी दिलेल्या निर्देशांचे कडक व काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
b. सर्व औद्योगिक व वाणिज्यीक प्रतिष्ठाने, कामाच्या ठिकाणी कामाची सुरुवात करण्यापुर्वी SOP जिल्हा कार्यालयात सादर करावी.
c. प्रतिबंधीत क्षेत्रात उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संबधीत क्षेत्राकरीता जिल्हादंडाधिकारी यांचेकडुन कर्मचारी दंडाधिकारी यांची Incident Commander म्हणुन नेमणुक करण्यात येईल. वर नमुद उपायोजनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नेमण्यात आलेल्या Incident Commander ची राहील. Incident Commander च्या कार्यक्षेत्रातील इतर खात्या च्या अधिकारी Incident Commander सुचनेप्रमाणे काम करतील. Incident Commander आवश्यकतेनुसार अत्यावश्यक सेवेकरीता पासेस निर्गमित करतील.
d. दवाखान्यातील पायाभुत सुविधा इतर सोयी कोणत्याही अडथळयाशिवाय सुरु राहतील. याची खात्री Incident Commander हे वारंवार करत राहतील.
सदर आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897, फैजदारी प्रकीया संहिता 1973 चे कलम 144 ,भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 व इतर संबधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
