पालकमंत्री तथा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मुळे आरोग्य विभाग ,सपाई कामगार व पोलीस विभागाच्या ४०० कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क वाटप
सिंदखेड राजा : प्रतिनिधि गजानन काळुसे :
सध्या कोरोनविरुद्ध सुरू असलेल्या या लढाईत अनेक घटक काम करत आहेत. जे रुग्णालयात काम करत आहेत त्यांना शासनाकडून पीपीई किट, मास्क याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना कुठलीच सुरक्षा नसल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील या सैनिकांसाठी सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार तथा पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः ४०० सुरक्षा किट उपलब्ध करून त्याचे वाटप केले आहे.

पीपीई किट मध्ये रेनकोटसारखा एक पूर्ण ड्रेस, हॅन्डग्लोज, चष्मा आणि टोपीचा समावेश आहे. सुरक्षा किटचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस कर्मचारी यांना वाटप करण्यात आले आहे.यावेळी सभापती विलासराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पंडितराव खंदारे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराजे जाधव , पंचायत समिती सदस्य नाथाभाऊ दराडे, इरफान अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन देशमुख यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.