वर्धा जिल्ह्याच्या बॉर्डरवर कंटेनर मध्ये प्रवास करताना तब्बल 45 जण ताब्यात
प्रतिनिधि : मयूर वानखडे
तळेगांव शा पंत :- आज तळेगांव अमरावती महार्गावर असलेल्या खडका बॉर्डर वर पोलिसांनी चेकिंग दरम्यान थांबवले असता त्यामध्ये अगदी गुराप्रमाणे लोक बसून असल्याचे पोलिसांना दिसले.
हा सगळा प्रकार बघून पोलिसही काही वेळ स्तब्ध झाले, पोलिसांनी त्यांना एका जवळच्याच शेतात बसवून त्यांची विचारपूस केली असता हे सर्व कामगार भिवंडी येथून अलाहाबादला जाण्यास निघाले असल्याचे सांगितले.
दोन दिवसांपासून हे सर्व या कंटेनर मधून प्रवास करत असल्याचे पुढे आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी हे सर्व मजूर काम करत होते त्याठिकाणी त्यांना दोन दिवसांपासून कोणी जेवण दिले नसल्याने त्यांनी आपल्या घरी वापस जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले सदर कार्यवाही ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआई रवी मनोहर यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.

