आर्वीत रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद


गौरव जाजू  मित्र परिवार, आर्वी द्वारा आयोजित रक्तदान शिबीर

174 रक्तदात्यानी केले रक्तदान * मनभावन क्रीड़ा मंडळाचे विशेष सहकार्य


आर्वी : कोरोना मुळे रक्तदान शिबिर कमी होत असल्याने लवकरच रक्तताचा तुटवडा निर्माण होण्याची नक्कीच शक्यता निर्माण झालेली आहे.
करीता आज कोरोना रोगराई ला मात देण्याकरीता गौरव जाजू मित्र परीवार यांचे माध्यमातून विविध मदतकार्य संपूर्ण शहरभर व परिसरात सुरु आहे.
याच माध्यमातून माहेश्वरी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या करीता लाइफ लाइन ब्लड बैंक नागपुर यांची टीम संकलन करणयाकरिता आर्वी ला आलेली होती. 

विशेष म्हणजे शिबिराला  रक्तदात्यानीं कोविड -१९ चा प्रभाव असून ही मोठ्या संख्येने युवक मित्र मंडळी यांनी उत्सपुर्त  प्रतिसाद दिला.एकूण 172 रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदात्याला आजपासून 4 महिन्यापर्यंत मोफत रक्त मिळेल असे गौरव जाजू यांनी जाहिर केलेले आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व सोशल डिस्टन्स नियमाचे संपूर्णता पालन करून आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक व तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी पाहणी करीता आले असता स्वता ही रक्तदान केलेनगराध्यक्ष प्रशांत सवालाखे यांनीही आयोजन स्थळी भेट दिली या आयोजनाला मनभावन क्रीड़ा मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
या आयोजना करिता मोहन छंगाणी,मोहित छंगाणी,सूरज माखीजा,दिलीप राठी,दर्शन पुरोहित,भूषण पुसदकर,मोहित कट्टा, रोहित थावली,हिमांशु कपले,मोहित कट्टा,गिरिराज राठी,फारूक शेख,दर्पण टोकसे,शुभम जगताप,अमन साहू,पवन ढोले,अब्राहर खान,वासुदेव भाऊ,हितेश मेन्द्रे मनभावन क्रीड़ा मंडला चे गजु शिंगाने,अंसार भाई, व सम्पूर्ण युवा मित्र परिवारानी अथांग प्रयत्न केले. सामाजिक दायित्व समझूंन मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे रक्तदात्यांचे गौरव जाजू यानी आभार मानले आहे.


Previous Post Next Post