गावात निल्क्षुक सेनिटायजर वाटप


युवा विचार मंच व भोयर पवार युवक आघाडी कडुन रामठी गावात निल्क्षुक सेनिटायजर वाटप

नरखेड : कोरोणा कोविड १९ या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण गामिण भागातील गावे भयभीत झाले असून नरखेड तालुक्यातील गावा मध्ये गावातील स्वयंसेवकानी गावबंदी सुध्दा केली आहे हे विशेष; काही सामाजिक संघटनांनी चक्क गावातील व अतंत्य गरीब लोकांसाठी भाजीपाला , तेल , धान्य , मिठ , साबण , सेनिटायजर वाटप करणे सुरू केले आहे; 

गोरगरिबांची काळजी सुध्दा काही सामाजिक संघटना घेत आहे त्यातील हे एक जिवंत उदाहरण नरखेड तालुक्यातील रामठी गावात चक्क पुर्ण घरी जाऊ जाऊ सेंनिटायजर वाटप करण्यात आले 

रामठी गावामध्ये युवा विचार मंच आणि भोयर पवार युवक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण रामठी गावामध्ये  निशुल्क सेनिटायझर वाटप  करून गावातील लोकांना कोरोना संसर्गजन्य आजारा विषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली, रामठी गावात एकूण 282 घरी सॅनिटायझर वाटप करण्यात आले .

सॅनिटायझर वाटप करण्याकरिता प्रा प्रमोद भलावी , इंजिनियर रवींद्र सावरकर, नितेश खवसे , शुभम खवसे , पवन पाठे , प्रवीण काटोले , अनिकेत इंगोले ,  अरुणराव बोवाडे उपस्तीत होते, रामठी गावातील सरपंच राजुभाऊ  चौधरी यांनी या उपक्रमाची प्रशंसा करतांना असेच कार्य पुन्हा करण्याकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन गावात सॅनिटायझर वाटप करण्यास सहकार्य केले. गावातील  नागरिकांनी सॅनिटायझर वाटप करण्याकरिता आर्थिक सहकार्य केले त्याबद्दल युवा विचार मंच यांनी त्यांचे आभार मानून पुन्हा गरज पडेल तेव्हा सहकार्य करावे अशी विन्नती सुद्धा केली. 


Previous Post Next Post