
आर्वी येथील जिनिंग-प्रेसिंग मालकाला दोन लाख रुपयांचा दंड जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय वर्धा यांच्यावतीने ठोठावण्यात आला आहे. कोरणा बाबत तपासणी पथकाने तपासणी केली असता आर्वी येथील काही मजूर आपल्या स्व गावी जाण्यास निघाले होते; सदर मजुरांची चौकशी केली असता हा मजूर आर्वी येथील बिपिन अग्रवाल जिनिंग-प्रेसिंग कंपनी येथील असल्याचा तपासणी पथकाच्या लक्षात आले.
कंपनीच्या मालकांनी मजुरांची राहाण्याची व खाण्याची व्यवस्था न करता त्यांना स्व गावी पाठवून दिले , त्यामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली या जिनिंग-प्रेसिंग मालकाने केल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून विपीन अग्रवाल यांना दोन लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच तात्काळ दोन ते तीन वाहने पाठवून सदर मजुरांना कंपनीत राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश या नोटीस मध्ये दिला आहे.
सदर कंपनीच्या मालकांनी मजुरांची राहाण्याची व खाण्याची व्यवस्था न करता त्यांना स्व गावी पाठवून दिले , त्यामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली या जिनिंग-प्रेसिंग मालकाने केल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून विपीन अग्रवाल यांना दोन लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच तात्काळ दोन ते तीन वाहने पाठवून सदर मजुरांना कंपनीत राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश या नोटीस मध्ये दिला आहे.