रोम जळत होतं, तेव्हा निरो फिडल वाजवत होता..
प्रशासनाची अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम नियोजन शून्य?... शहरातील नेते मंडळी नॉट रिचेबल?
धिरज मानमोडे : संपाद्क
आर्वी : शहरांमध्ये प्रियांशी लायचा हिचा दुर्घटनेत दुःखद मृत्यू झाला ही घटना आर्वी शहराला दुःखाच्या खाईत लोटणारी होती, घटनेनंतर सर्व सामन्य लोकांमध्ये रोष निर्माण होणे स्वाभाविक होते; त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी जी तत्परता दाखविली ती नियोजन शून्य होती असा सुरु आता उमटू लागला आहे. अतिक्रमण हटविण्याची जी मोहीम ताबडतोब राबविली त्यामुळे शेकडो लोकांना उध्वस्त करणारी ठरली, त्यांना रस्त्यावरती आणून त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतले त्यांना एका क्षणात होत्याचे नव्हते केले. परंतु हीच तत्परता प्रशासनाने आधीच आणि वेळोवेळी दाखवली असती तर आज एवढा तांडव आर्वी शहरात झाला नसाता. प्रियांशी च्या अपघाती मृत्यूची प्रशासन वाट तर पाहत नव्हते ना असा प्रश्न आता समोर उभा ठाकला आहे.
आर्वी शहरात यापूर्वी अनेक अश्या मोहिमा आल्या आणि गेल्या परंतु एवढी तत्परता प्रशासनाने केव्हाच दाखविली नाही. २०१९ च्या आधी अनधिकृत होर्डिंग चा विषय नगर पालिका प्रशासनाने सुरु केला होता त्याचे पुढे काय झाले? पूर्वी बॅनर लावायची रीतसर परमिशन घ्यावी लागत होती त्यांनतर ते बॅनर लावण्यात येत होते मात्र आता अक्ख शहर अनधिकृत होर्डिंग मुळे झाकलं गेले आहे. यावर प्रशासन झोपा काढत आहे असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. पूर्ण आर्वी जळत असतांना आर्वीचे नेते नॉट रिचेबल होऊन शहर सोडून गायब होते? कारण लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची हिमंत त्यांनी दाखविली नाही.
परंतु ज्यांचे सगळं उद्धवस्त होत होते त्यांना कुठे तरी कोणी मध्यस्ती करेल अशी अशा होती परंतु सत्ताधारी आणि विरोधक फक्त मजा पाहण्यात आणि विडिओ काढण्यात व्यस्त होते. परंतु सुमित वानखेडे यांनी हि परिस्थिती सांभाळली त्यामुळे त्यांनाही काहींनी टार्गेट केले, कि मध्यस्ती करायला नको होती. परंतु आर्वी पेटत असताना आपण फक्त बघ्याची भूमिका घेणे किंवा इतरांसारखे शहर सोडून पळून जाणे याला प्राधान्य न देता प्रशासनाच्या असंवेदनशील क्रूर भूमिकेला सामोरे जाणे त्यांनी योग्य मानून आपल्या परीने अतिक्रमण मोहिमेवर स्थगिती आणली. त्यामुळे सुमित वानखेडे यांचे कुशल नेतृत्व आर्वी कर जनतेने अनुभवले, सुमित वानखेडे यांची भूमिका त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया च्या माध्यमातून स्पष्टच केली आहे, बेकायदेशीर अतिक्रण निघालेच पाहिजे त्यात तिळमात्र शंका नाही, परंतु ज्या क्रूर भूमिकेतून हे सगळं षडयंत्र रचलं त्याला त्यांनी विरोध केला.
क़ायदेशीर रित्या करवाई शक्य !
अश्या पद्धतिने बेकायदेशीर रित्या लोकांचे आयुष्य उद्भवस्त करायचा अधिकार कोणी या करवाई करणार्यांना दिला?. अधिकाराच्या खुर्ची वर बसले की लोक इतके निर्दयी इतके असंवेदशील का होतात. असा प्रश्न सर्व सामान्य जनेतला पडला आहे. क़ायदेशीर रित्या करवाई शक्य असतांना नियम्बाह्य रित्या लोकांना उद्वस्त करून प्रशासनाने घोळ चूक केली कि कोणाच्या सांगण्यावरून केली हे तपासणे गरजेचे आहे. या दांडेलशाहीच्या खाली छोटे दुकानदार - व्यवसायी पिचले गेले आणि त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम यावेळी प्रशासणाने केले, शहर अतिक्रमण मुक्त होणे अत्यंत आवश्यक आहे. पण कारवाई करतांना “हम करे सो कायदा “या पद्धतीने वागुण गरीब माणसाला आयुष्यातुन उठवायचा अधिकार या देशात कुणालाच नाही. नियम धाब्यावर ठेऊन केलेली कार्यवाही नक्कीच कोणीही मान्य करणार नाही.. झालेला दुर्घटना अत्यंत दुःखद आहे.. परंतू याचा आधार घेऊन प्रशासनाने केलेली कार्यवाही ही सुड बुद्धीने केली असा सर्वत्र सूर उमटत आहे. बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसी देऊन हि कारवाई करता आली असती परंतु गाढ झोपलेले प्रशासन अश्या घटना घडल्या तरच जागे होते हे यावरून पुन्हा एकदा सिद्द झाले.
शहरातील अवैध होर्डिंगवर कारवाई केव्हा?
आर्वी शहरात २०१९ च्या आधी अनधिकृत होर्डिंग चा विषय नगर पालिका प्रशासनाने प्रामुख्याने अजेंड्यावर आणला होता त्यानुसार कारवाई सुरु झाली होती परंतु आज चित्र जैसे थे आहे? पूर्वी बॅनर लावायची रीतसर परमिशन घ्यावी लागत होती त्याचे पावती बॅनरवर प्रिंट करणे बांधकारक होते, त्यांनतर ते बॅनर लावण्यात येत होते मात्र आता अक्ख शहर अनधिकृत होर्डिंग मुळे झाकलं गेले आहे. यावर प्रशासन झोपा काढत आहे असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
शहरातील नेते मंडळी नॉट रिचेबल?
पूर्ण आर्वी जळत असतांना आर्वीचे नेते नॉट रिचेबल होऊन शहर सोडून गायब होते? कारण लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची हिमंत त्यांनी दाखविली नाही. परंतु ज्यांचे सगळं उद्धवस्त होत होते त्यांना कुठे तरी कोणी मध्यस्ती करेल अशी आशा होती परंतु सत्ताधारी आणि विरोधक फक्त मजा पाहण्यात आणि विडिओ काढण्यात व्यस्त होते.