पतसंस्था घोटाळ्याने गुंतवणूकदार बैचेन; परतूर मंठा तालुक्यातही अस्वस्थता.. पदाधिकारी विदेशात!
कृषीप्रधान न्युज नेटवर्क : अरुण राठोड / लक्ष्मीकांत राऊत
परतूर : संभाजीनगर मधील पतसंस्था घोटाळे उघड झाल्याने पतसंस्थेत ठेवी ठेवणारे गुंतवणूकदार चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. याचा मोठा फटका आपल्याकडील पतसंस्थांना ही बसण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या काही दिवसात संभाजीनगर मधील २०० कोटीच्या आदर्श पतसंस्था घोटाळ्यात पोलीसांनी चौथा गुन्हा दाखल केला. त्यासोबत देवाई पतसंस्थेचे अध्यक्ष व ईतर २२ कोटीचा घोटाळा करून थायलंड ला पळून गेले. व आता ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सुमारे सव्वादोनशे कोटीच्या ठेवी यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.यासर्व संभाजीनगर च्या पतसंस्था घोटाळ्याने पतसंस्थेत आपल्या ठेवी ठेवणारे गुंतवणूकदार चांगलेच बैचेन झालेले आहेत.परतूर मंठा तालुक्यातील पतसंस्थेत अद्याप घोटाळ्याची कोणतीही बातमी समोर आली नसली तरी यात आपल्या ठेवी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
ठेवी ठेवणारे गुंतवणूकदार संभाजीनगर पतसंस्था घोटाळ्याने हादरले आहेत हे नक्की. तालुका तसेच ग्रामीण भागात मागील काही वर्षांपासून पतसंस्था मोठ्या संख्येने उघडताना दिसत आहेत. अनेक ठेवीदार आपला कष्टाचा पैसा अडका येथे ठेवत असल्याने घोटाळा बातम्यांनी त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.नाव न सांगण्याच्या अटीवर एका गुंतवणूक दाराने सांगितले की आपला विश्वास आता उडाल्याने गेल्या काही दिवसात मी सर्व गुंतवणूक व्याजाची चिंता न करता काढून घेतली आहे. एकूण संभाजीनगर मधील तीन चार पत संस्था मधील घोटाळा प्रकरणी आपल्या कडील गुंतवणूकदार सावध होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे पतसंस्था उघडण्या ची स्पर्धा लागल्याचेही चित्र आहे.

.jpeg)
